Latur: बायकोवर चिडलेल्या नवऱ्याने मारला लेकीला दगड, मार वर्मी लागल्याने मृत्यू; आरोपीला जन्मठेप
धक्कादायक म्हणजे तिच्या मृत्यूस तिचा बापच कारणीभूत ठरला आहे. दोषी बापाला न्यायालयाने जन्मठेप आणि 10 हजा रुपये दंडाची शिक्षा सुनावली. लातूर (Latur) जिल्ह्यातील औसा तालुक्यातील आशिव गावात ही घटना घडली.
आई-वडीलांचे भांडण सोडविण्यासाठी जाणे एका मुलीच्या जीवावर बेतले आहे. धक्कादायक म्हणजे तिच्या मृत्यूस तिचा बापच कारणीभूत ठरला आहे. दोषी बापाला न्यायालयाने जन्मठेप आणि 10 हजा रुपये दंडाची शिक्षा सुनावली. लातूर (Latur) जिल्ह्यातील औसा तालुक्यातील आशिव गावात ही घटना घडली. सुधीर शंकर बंडगर हे 40 वर्षीय गृहस्थ आपल्या कुटुंबासोबत राहात होते. दरम्यान, 15 नोव्हेंबर 2020 च्या सकाळी त्यांचा आणि पत्नीचा किरकोळ कारणावरुन वाद झाला. या वादाचे पर्यावसण मोठ्या भांडणात झाले. त्यातून हाणामारी सुरु झाली. दरम्यान, आई-वडीलांची भांडणे सोडवीण्यासाठी 15 वर्षीय मुलगी मधे पडली. मात्र, प्रचंड संतप्त झालेल्या वडील सुधीर बंडगर यांनी रागाने दगड उचलला आणि तो मुलीला फेकून मारला. रागाने मारलेला दगड वर्मी लागला. त्यात मुलगी जागेवरच बेशुद्ध होऊन खाली कोसळली. तिला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले.
मुलीचे वडील सुधीर शंकर बंडगर यांच्या विरोधात त्यांच्या पत्नीने भादा पोलीस ठाण्यात सदर प्रकरणाची फिर्याद दिली. पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 302, 323, 506 अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीला अटक करुन तपास सुरु केला. न्यायालयाने आरोपीला 17 नोव्हेंबर 2022 रोजी जन्मठेपेची शिक्षा आणि दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. (हेही वाचा, Crime: पत्नीने जेवणासाठी बिर्याणी बनवली नाही, मद्यधुंद पतीने मारहाण करत केला वार)
घटनास्थळ आणि परिस्थितीजन्य पुरावे गोळा करुन पोलिसांनी न्यायालयासमोर मांडले. न्यायालयाने साक्षी पुराव्यांची खातरजमा करुन आरोपी सुधीर शंकर बंडगर याला दोषी ठरवले. पोलिसांकडे या प्रकरणात भक्कम पुरावे होते. त्यामुळे ही केस अंटर ट्रायल चालविण्यात आली. फक्ते केवळ किरकोळ कारणावरुन एका मुलीला आपले प्राण गमवावे लागले. या घटनेची परिसरात प्रचंड चर्चा झाली होती.