लातुर: शिक्षकांचा दारु पिऊन शाळेत धिंगाणा, पोलिसांकडून अटक

या प्रकरणी दोन शिक्षकांना अटक करण्यात आली आहे.

Representational Image (Photo Credit: ANI)

लातुर (Latur) येथील एका शाळेतील शिक्षकांनी दारु पिऊन धिंगाणा केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दोन शिक्षकांना अटक करण्यात आली आहे. शाळेत स्वातंत्र्य दिना निमित्त तयारी करण्यात येत होती त्यावेळी ही घटना घडली आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळेतील दोन शिक्षकांनी स्वातंत्र्य दिनासाठी तयारी सुरु असताना वर्गात येत धिंगाणा घालण्यास सुरुवात केली. तसेच शाळेतील अन्य शिक्षकांना या दोन दारुड्या शिक्षकांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. या शिक्षकांचा दारुच्या नशेतील प्रकार पाहत शाळेच्या अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले. तरीही हे दोन शिक्षक गैरवर्तवणुक बंद करण्याचे नाव घेत नव्हते.(Mumbai: परदेशातून आलेल्या महिलेने पोटात लपवून आणले 5 कोटींचे कोकेन असलेल्या 80 कॅप्सूल्स, मुंबई विमानतळावर झाली अटक)

अखेर पोलिसात या शिक्षकांची तक्रार करत त्यांना अटक करण्यात आली आहे. तसेच दारुड्या शिक्षकांचा हा प्रकार पाहून विद्यार्थ्यांच्या पालकांनी संताप व्यक्त केला आहे. तर गावातील सरपंचांनी या अशा शिक्षकांमुळे शाळा बदनाम होत असल्याचा आरोप लावला आहे.