Latur Crime News: लातूर जिल्ह्यात धक्कादायक प्रकार, मित्रच निघाला आईचा प्रियकर; संतापून केली तरुणाची निद्रावस्थेत हत्या
झोपेत असताना मित्राची हत्या करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
Latur Crime News: लातुर जिल्ह्यातील औसा तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. झोपेत असताना मित्राची हत्या करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. तरुणाच्या डोक्यात व गळ्यावर वार करण्यात आले.या जीव घेण्या हल्ल्यात तरूणाचा मृत्यू झाला. या घटनेबाबत पोलिसांनी आरोपी मित्रावर गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे. रणजित उर्फ तानाजी माळी असं खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. आईसोबत नको त्या संबंधांचा संशय आल्याने आरोपी मित्राने मित्राची हत्या केल्याचे समोर आले आहे. (हेही वाचा-दारूच्या व्यसनाला कंटाळून पतीची निद्रावस्थेत निर्घृण हत्या)
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आले. शुक्रवारी रणजित आपल्या शेतात मुक्कामी गेला होता. दरम्यान मध्यरात्री अज्ञात हल्लेखोरांनी गोठ्यात झोपलेला असताना त्याच्यावर गळ्यावर आणि डोक्यात कोयत्याने वार करून त्याचा खून केला. दुसऱ्या दिवशी शनिवारी या घटनेची माहिती पोलिस ठाण्यात देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. त्यानंतर पुढील तपास सुरु केला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रणजित हा अविवाहीत होता. तो आई वडिलांसोबत शेतात काम करायचा.
पोलिसांनी या घटनेअंतर्गत गावात कंबर कसून चौकशी केली. तर रणजितचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचे समजले. त्यावेळी महिलेचा मुलगा हा रणजितचा जवळचा मित्र असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी मित्राची चौकशी केली तेव्हा त्याने उडावउडवीची उत्तरे दिली. गावातील एकाने पोलिसांना सांगितले की, तरुणाने काही दिवसांपूर्वीच कोयत्याची धार बनवून ठेवली होती. त्यामुळे पोलिसांचा संशय हा वाढत गेला. पुन्हा चौकशीला बोलावण्यात आले आणि त्याने खुनाची कबुली दिली. आईसोबत अनैतिक संबंध असल्यावरून हत्या केल्याची कबुली दिली.