Lasalgaon APMC Turnover: लासलगांव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 1315 कोटी रुपयांची उलाढाल, एैन लॉकडाऊनमध्ये एकट्या कांद्याने मारलं 939 कोटी रुपयांचं मार्केट

एप्रिल 2020 ते मार्च 2021 या आर्थिक वर्षात 1314, 80,98 रुपयांची उलाढाल पाहायला मिळाली. कोरोना संसर्ग उच्च स्थानी असताना घेण्यात आलेल्या लॉकडाऊन काळातही 81,83,000 क्विटर शेत माल आवक झाला. उल्लेखनिय असे की, या काळात बाजार समितीचे लिलाव बंद होते.

Nashik Lasalgaon APMC | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

कोरना व्हायरस (Coronavirus) महामारीत अनेक क्षेत्रांना फटका बसला. त्यात लॉकडाऊनमुळे (Lockdown) अनेकांचे उद्योग, व्यवसाय कायमचे बंद झाले. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. अर्थव्यवस्था धोक्यात आली. असे असले तरी ऐन लॉकडाऊन आणि करोना महामारीतही शेती क्षेत्र मात्र जैसे थे राहिले. शेती क्षेत्राने अर्थव्यवस्थेला मोठी चालना दिली. नाशिक जिल्ह्यातील लासलगांव कृषी उत्पन्न बाजार समिती (Lasalgav Agricultural Produced Market Committee) याचे एक उत्तम उदाहरण. ऐन लॉकडाऊनमध्ये लासलगवा कृषी उत्पन्न बाजार (Lasalgaon APMC) समितीमध्ये तब्बल 1315 कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. एकट्या कांदा बाजारपेठेतच (Onion Market) सुमारे 939 कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. बाजार समिती सभापती सुवर्णा जगताप यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. विशेष असे की, लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती (Lasalgaon APMC) ही अशिया खंडातील सर्वात मोठी आणि अग्रेसल कांदा बाजारपेठ म्हणून ओळखली जाते.

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा आणि इतर कृषी मलाची मोठी आवक झाली. एप्रिल 2020 ते मार्च 2021 या आर्थिक वर्षात 1314, 80,98 रुपयांची उलाढाल पाहायला मिळाली. कोरोना संसर्ग उच्च स्थानी असताना घेण्यात आलेल्या लॉकडाऊन काळातही 81,83,000 क्विटर शेत माल आवक झाला. उल्लेखनिय असे की, या काळात बाजार समितीचे लिलाव बंद होते. (हेही वाचा, Nashik Lasalgaon APMC: लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समीतीने बदलला 75 वर्षांचा पायंडा; अमावस्येलाही होणार धान्य, कांदा लिलाव)

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एकट्या कांद्याची उलाढाल 939 कोटी रुपये झाली. तर त्यासोबतच धान्य, भाजीपाला, टोमॅटो, डाळिंब, यासह इतर शेतीमालाचीही मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने उलाढालही विक्रमी झाली.

मागील 5 वर्षातील कांदा उलाढाल

मागील 5 वर्षातील कांदा उलाढालही अपवाद वगळता सर्वसाधारण चढीच राहिली आहे. या उलाढालीच्या सालनिहाय आकडेवारीकडे नजर टाकता दिसून येते की, सन 2016-17 – 236 कोटी, सन 2017-18 – 831 कोटी, सन 2018-19 – 416 कोटी,सन 2019-20 – 1141 कोटी, सन 2020-21 – 939 कोटी उलाढाल पाहायला मिळली.

दुसऱ्या बाजूला पाठिमागील पाच वर्षातील शेतमाल आवक आणि उलाढाल पाहिली असता लासगलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये, सन 2016-17 मध्ये 53,80,000 हजार क्विंटल – 417 कोटी, सन 2017-18 – 68, 82,000 क्विंटल-1098 कोटी, सन 2018-19 – 76,92,000 क्विंटल -643 कोटी, सन 2019-20 – 72,78,000 क्विंटल -1419 कोटी, सन 2020-21 – 81, 43,000 क्विंटल -1314 कोटी इतक्या प्रमाणावर उलाढाल झाल्याचे पाहायला मिळते.