Landslide in Malshej Ghat: माळशेज घाटात रिक्षा वर दरड कोसळून दोघांचा मृत्यू; 3 जखमी
पावसाळयात माळशेज घाटामध्ये निसर्गाचं सौंदर्य पाहण्यासाठी, धबधबे पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी असते पण हा भाग दरडप्रवण क्षेत्र असल्याने तेथे काळजी घेणेही आवश्यक आहे.
मुंबई, पुणे सह आजुबाजूच्या भागात पावसाला जोरदार सुरूवात झाली असल्याने आता पडझडीच्या घटना देखील समोर येत आहेत. कल्याण वरून अहमदनगरला जाणार्या राष्ट्रीय महामार्ग 222 वर माळशेज घाटामध्ये (Malshej Ghat) दरड कोसळून दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मुंबई वरून अहमदनगरला आपल्या गावी जात असताना हा अपघात झाला. यामध्ये मृत्यू पावलेले दोन जण काका-पुतण्या आहेत तर अन्य तीन जण जखमी आहेत.
मुलुंड वरून भालेराव कुटुंबीय अहमदनगरला संगमनेर तालुक्यातील चंदनापूर या आपल्या मूळ गावी जात होते. मुरबाड नंतर टोकावडे पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये घाट रस्त्याने जात असताना अचानक रिक्षावर दरड कोसळली आणि त्यामध्ये या दोघांचा मृत्यू झाला. रिक्षामध्ये तिघांनी प्रसंगावधान दाखवत स्वतःचा जीव वाचवला. दरम्यान ही दरड कोसळल्याची घटना समजताच स्थानिक पोलिस आणि अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. ही घटना आज पहाटे 4.30 च्या सुमाराची आहे. मागील काही दिवसांपासून या भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. Malshej Ghat Tanker Accident: माळशेज घाटात दोन टॅंकरची धडक, भीषण अपघातात चार दगावले .
महाराष्ट्र के मालशेज घाट पर लैंड स्लाइड.
लैंड स्लाइड की वजह से बड़े बड़े पत्थर ऑटो और गाड़ियों पर गिरे.
2 लोगो की मौत और 3 लोग घायल.#MaharashtraNews pic.twitter.com/rArxN2dvdA
— Vivek Gupta (@imvivekgupta) June 12, 2024
पावसाळ्यामध्ये माळशेज घाटात निसर्गाचं नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी अनेक पर्यटक गर्दी करतात पण या भागात दरड कोसळण्याच्या घटना दरवर्षी घडत असल्याने पर्यटक आणि या मार्गावरून वाहतूक करणारे प्रवासी देखील जीव मुठीत घेऊन ये-जा करत असतात. या भागात काही ठिकाणी नेट फेंसिंग केले आहे मात्र हा भाग दरडरडप्रवण क्षेत्र असून दरवर्षी या ठिकाणी असे अपघात होत असतात.
(The above story first appeared on LatestLY on Jun 12, 2024 09:10 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

