Lalit Patil Drug Case: ललित पाटील च्या अखेर मुसक्या आवळण्यात अखेर पोलिसांना यश; तामिळनाडू मधून अटक

ड्रग सिंडिकेट त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होते पण पोलिसांच्या जाळ्यात तो अडकला.

Arrest | Pixabay.com

पुण्याच्या (Pune) ससून हॉस्पिटल (Sasson Hospital) मधून अमली पदार्थांची तस्करी करणारा ललित पाटील याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 1 दिवसांपासून फरार असलेला ललित तामिळनाडू मध्ये सापडला आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Mumbai Police Crime Branch)  त्याला तामिळनाडू (Tamil Nadu) मधून ताब्यात घेतलं आहे. ललित 2 ऑक्टोबर पासून पळून गेला होता.

ललित पाटील हा आंतरराष्ट्रीय पातळीवर चालणाऱ्या मोठ्या ड्रग सिंडिकेटचा एक भाग आहे. ड्रग सिंडिकेट त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होते पण पोलिसांच्या जाळ्यात तो अडकला.

महाराष्ट्रात ललित फरार असण्यावरून राजकारण रंगलं होतं. आरोप- प्रत्यारोप होत होते. एका बड्या नेत्याच्या मदतीनेच ललित पाटील पळून गेल्याचा आरोपही करण्यात आला. पण या एक फोन कॉल आणि ललित पोलिसांच्या ताब्यात आला. दरम्यान मुंबई पोलिसांच्या ताब्यात असलेल्या एका आरोपीशी तो फोनवर बोलत होता. पोलिसांना या फोन कॉल द्वारा त्याचा ठावठिकाणा लागला. त्यानंतर साकिनाका पोलिसांची 3 पथकं रवाना झाली.

ललित लपलेला असलेल्या हॉटेलमध्ये पोलिस पोहचले आणि ललित सह अन्य 2 आरोपींना देखील अटक करण्यात त्याला यश आलं. साकिनाका पोलिसांच्या कामगिरीचं देखील कौतुक होत आहे. आता ललितला पुण्यात आणलं जाईल आणि नंतर कोर्टासमोरहि दाखल केले जाईल. Sameer Wankhede Receives Death Threats Message: समीर वानखेडे यांना बांगलादेशातील अतिरेक्यांकडून जीवे मारण्याची धमकी; तपास सुरु .

ललित पाटील प्रकरण काय आहे?

पुण्यातील ससून रुग्णालय परिसरात 2 कोटी रुपयांचे ड्र्ग्ज सापडले होते.यामध्ये  बंडगार्डन पोलीस ठाण्यात एनडीपीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यामध्ये आत्तापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली असून यातील दोघांना उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील बारंबाकी इथून दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

ड्रग्ज प्रकरणात पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर ससून रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. येथे 9 महिने उपचार घेतल्यानंतर तो 2 ऑक्टोबरला पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला. यामुळे पोलिस यंत्रणा ढिसाळपणे काम करत असल्याचे आरोपही झाले.