Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना महाराष्ट्राची, लाभ परराज्यातील महिलांना; मोठे रॅकेट उघड, बार्शी पोलिसांत गुन्हा दाखल

Ladki Bahin Yojana Corruption: लाडकी बहीण योजना लाभ मिळविण्यासाठी परप्रांतीय रॅकेट सक्रीय झाल्याचे पुढे आले आहे. उत्तर प्रदेश, आसाम आणि राजस्थान येथील महिलांनीही फेक आयडीच्या माध्यमातून योजनेचा लाभ मिळवल्याचे निदर्शनास आल्याने सोलापूर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

Ladki Bahin Yojana | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) राज्यभरातील अनेक महिलांसाठी लाभदायक ठरत असली तरी, अद्यापही निकष आणि कागदपत्रांची अपूर्तता यांमुळे अनेकजणी या लाभापासून वंचितही आहेत. तर निकषाबाहेर असूनही लाभ घेतलेल्या काही महिलांनी स्वत:हून या योजनेतून आपले नाव मागे घेतले आहे. असे असतानाच या योजनेत परप्रांतीय रॅकेट (Ladki Bahin Yojana Racket) सक्रीय झाले असून, परराज्यातील महिलांच्या नावे बोगस अर्ज दाखल करुन योजनेचा लाभ मिळवल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. त्यामुळे या योजनेत नियमांचे उल्लंघन करुन लाभ मिळवण्याचे उद्योग झाले आहेत का? असा सवाल उपस्थित केला जाऊ लागला आहे. या प्रकरणी सोलापूर येथे 22 अज्ञातांविरोधात गुन्हाही दाखल झाला आहे.

परराज्यातील महिलांच्या नावे बोगस लॉगिन आयडी

लाडकी बहीण योजना केवळ महाराष्ट्राच्या नागरिक असलेल्या आणि निकषांमध्ये पात्र ठरलेल्या महिलांसाठीच आहे. सहाजिकच महाराष्ट्रातील आहेत परंतू, निकषात बसत नाहीत अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळत नाही. असे असताना जर राज्यातील महिलांनाच लाभ नसेल तर तो परराज्यातील महिलांना कसा असणार? असा साधा प्रश्न. पण घडले भलतेच. ई-सकाळडॉटकॉमने दिलेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्राबाहेरील आणि परराज्यातील महिलांच्या नावे बोगस लॉगिन आयडी तयार करण्यात आले असून, त्याद्वारे तब्बल 1171 अर्ज दाखलही करण्यात आले आहेत. खास करुन हा धक्कादायक प्रकार सांगली, सोलापूर आणि लातूर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका असल्याचे दाखवून घडला आहे. आश्चर्याची बाब अशी की, ज्याच्या नावे अर्ज केल्या त्या महिला उत्तर प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल आणि राजस्थान राज्यातील आहेत. या महिला जिल्ह्यातील विविध गावांमधील रहिवासी असल्याचे दाखवून हा प्रताप करण्यात आला आहे. (हेही वाचा, Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना, राजकीय लाभासाठी राज्याची तिजोरी रक्तबंबाळ)

बोगस लाभार्थ्यांचा लाभ तत्काळ स्थगित

लाडकी बहीण योजना लाभ मिळवताना बोगस अर्ज आले असल्याची माहिती मिळताच सदर अर्जांवरील लाभार्थ्यांचे लाभ तत्काळ स्थगित करण्यात आल्याचे समजते. प्रकरणाची चौकशी करुन अर्जांचीही छाननी केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, जे आधार क्रमांक वापरुन अर्ज दाखल करण्यात आले, त्या अर्जदाराचे अपलोड करण्यात आलेले आधार, पॅन आणि इतर कागदपत्र अस्पष्ट असल्याचे आढळून आले आहे. (हे वाचा, Ladki Bahin Yojana: 'लाडकी बहीण योजना', सरकारविरोधात सामान्य जनतेमध्ये संताप)

दरम्यान, आतापर्यंत दोन लॉग इन आयडीवरुन 1171 बनावट अर्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यातील काही अर्ज सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील आहेत. या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now