Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजने अंतर्गत महिलांना तीन सिलेंडर मोफत मिळणार; बँक खात्यात इतके पैसे जमा होणार

अन्न व नागरी पुरवठा विभागाने मंगळवारी यासंदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध केला.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतंर्गत (mukhyamantri mazi ladki bahin yojana) पात्र महिलांना महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. राज्य सरकारने  लाभार्थ्यांना आणखी एक गिफ्ट दिले आहे. त्यानुसार आता लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना वर्षाला तीन घरगुती गॅस सिलिंडर मोफत (gas cylinder) मिळणार आहेत.  राज्य सरकारने अलीकडेच राज्यातील 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठी ही योजना सुरु केली आहे.  (हेही वाचा - BMC Digital Hoardings Policy: डिजिटल होर्डिंग्जवर व्हिडिओ जाहिराती दाखविण्यावर नियंत्रण; मुंबई महापालिका धोरण मसुदा)

राज्य सरकारने लाडक्या बहीण योजनेतील लाभार्थ्यांनाही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ देण्याचे ठरवले आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाने मंगळवारी यासंदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध केला. यंदाचा अर्थसंकल्पात राज्य सरकारकडून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा करण्यात आली होती.  राज्यात आजघडीला 3 कोटी 49 लाख कुटुंबांकडे घरगुती गॅस सिलिंडर जोडणी आहेत. मात्र, दोन्ही योजनांचे निकष पाहता यापैकी 2 कोटी कुटुंबाना संबंधित योजनेचा लाभ मिळू शकतो

उज्ज्वला गॅस योजनेतंर्गत सध्या केंद्र सरकार पात्र महिला लाभार्थ्यांना 300 रुपयांचे अनुदान देते. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतंर्गत राज्य सरकार त्यांच्या खात्यात आणखी 530 रुपये जमा करेल. तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार असल्याने त्यांच्या बँक खात्यात प्रतिसिलिंडर 830 रुपये जमा करणार आहे.  1 जुलै 2024 रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळेल.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif