Ladki Bahin Yojana: 'लाडकी बहीण योजना'चा जुलैला हफ्ता कधी येणार? 5 मिनिटांत पहा तुमचं नाव पात्रता यादीत आहे का?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी आणि पडताळणी प्रक्रियेनंतर सुमारे ८० लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. जुलैचा १५०० रुपयांचा हप्ता मिळण्यासाठी लाभार्थी यादीत नाव आहे की नाही, हे ऑनलाइन तपासण्याची सोपी प्रक्रिया पहा.

Ladki Bahin Yojana: 'लाडकी बहीण योजना'चा जुलैला हफ्ता कधी येणार? 5 मिनिटांत पहा तुमचं नाव पात्रता यादीत आहे का?
Ladki Bahin Yojana | ( (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने' (Ladki Bahin Yojana) च्या लाभार्थीं  ही सध्या राज्यातील बहुचर्चित योजनांपैकी एक आहे. मात्र त्यांच्यासाठी पात्र लाभार्थ्यांबद्दल अनेक संभ्रम आहेत. ई-केवायसी आणि कागदपत्र पडताळणी प्रक्रियेनंतर राज्यातील सुमारे ८० लाख महिला या योजनेतून अपात्र ठरल्याचे काही रिपोर्ट्स मधून पुढे आले आहे. दरम्यान अद्याप राज्यातील महिलांना जुलै महिन्याचा हप्ता मिळालेला नाही. ज्या  महिला अपात्र ठरल्या आहेत किंवा ज्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही त्यांना या यादीमधून वगळण्यात येण्याची शक्यता आहे त्यामुळे आपले नाव लाभार्थी यादीत आहे की नाही, याची खातरजमा करून घेणे आवश्यक झाले आहे. जुलै महिन्याच्या १५०० रुपयांच्या हप्त्याबाबतही महिलांमध्ये उत्सुकता कायम आहे.

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'त 80 लाख महिला अपात्र का ठरल्या?

योजनेच्या निकषांची पूर्तता न करणाऱ्या तसेच ई-केवायसी अपूर्ण असलेल्या महिलांची सध्या व्यापक छाननी सुरू आहे. या पडताळणी प्रक्रियेत सुमारे ८० लाख महिलांची नावे अपात्र लाभार्थींच्या यादीत गेली आहेत. यामुळे अनेक महिलांच्या मनात हप्ता मिळणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'च्या लाभार्थी यादीत नाव तपासण्याची प्रक्रिया काय?

आपले नाव लाभार्थी यादीत आहे की नाही, हे अवघ्या काही मिनिटांत ऑनलाइन तपासता येते. यासाठी सर्वप्रथम योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. त्यानंतर नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि पासवर्डच्या मदतीने लॉगिन करावे लागेल. लॉगिन केल्यानंतर 'अर्जाची स्थिती' किंवा 'लाभार्थी यादी' हा पर्याय निवडावा. पुढे आधार क्रमांक किंवा अर्ज क्रमांक टाकल्यानंतर अर्ज मंजूर झाला आहे की नाही आणि लाभार्थी यादीत नाव आहे की नाही, याची संपूर्ण माहिती स्क्रीनवर दिसेल.

 कोणत्या महिलांना हप्ता मिळणार?

ज्या महिलांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे, आवश्यक कागदपत्रांची पडताळणी यशस्वी झाली आहे आणि त्या योजनेच्या सर्व निकषांत बसतात, अशा महिलांना जुलै महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे. मात्र पडताळणीत अपात्र ठरलेल्या किंवा ई-केवायसी अपूर्ण असलेल्या महिलांचा लाभ थांबू शकतो.

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'चा जुलैचा हप्ता कधी येणार?

सूत्रांच्या माहितीनुसार, जुलै महिन्याचा हप्ता १२ ते १५ ऑगस्ट दरम्यान लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. जर या कालावधीत हप्ता जमा झाला नाही, तर २०२४ सालाप्रमाणे रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचा मिळून एकूण ३००० रुपयांचा लाभ एकत्रित दिला जाऊ शकतो. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा सरकारकडून करण्यात आलेली नाही.

महिलांनी काय करावे?

ज्या महिलांचा हप्ता प्रलंबित आहे, त्यांनी सर्वप्रथम आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे का, याची खातरजमा करावी. तसेच अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपले नाव लाभार्थी यादीत आहे की नाही, हे वेळोवेळी तपासत राहावे. अर्जात काही त्रुटी आढळल्यास संबंधित कार्यालयाशी संपर्क साधून त्या दुरुस्त करून घेणे उचित ठरेल.

(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).