Ladki Bahin Yojana: लाडकी बहिन योजनेच्या लाभार्थी यादीची छाननी होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणले नेमक? घ्या जाणून
तर योजनेची रक्कमही 1,500 रुपयांवरून 2,100 रुपये पर्यंत वाढवली आहे.
Ladki Bahin Yojana: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर काही तासांतच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जाहीर केले की, त्यांचे सरकार लोकप्रिय योजना लाडकी बहिन योजनेची (Ladki Bahin Yojna) छाननी करणार आहे. प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत फडणवीस म्हणाले की, त्यांच्या सरकारच्या पहिल्या उपाय योजनांपैकी एक म्हणजे लाभार्थ्यांच्या यादीची तपासणी करणे. जे अपात्र आहेत त्यांना बाहेर काढणे. 'लाभार्थी निकषांचे पालन करत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यांची छाननी आवश्यक आहे. योजना पूर्णपणे बदलली जाणार नाही.'असे मुख्यमंत्री म्हणाले. शेतकरी सन्मान योजनेच्या धर्तीवर ही छाननी केली जाईल.
छाननीचे महत्त्व सांगताना त्यांनी शेतकरी सन्मान योजनेवेळी झालेल्या मोठ्या गोंधळाचे उदाहरण दिले. 'शेतकरी सन्मान योजनेवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हा शेतकरी सन्मान योजना चालू केली होती. तेव्हा पहिल्यांदा मोठ्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळाला होता. त्यानंतर काही शेतकऱ्यांनी स्वत: समोर येऊन आम्ही निकषात येत नाहीत', असे सांगितले होते.त्यानंतर योजना स्थिर झाली'
सध्या, महाराष्ट्रात लाडकी बहिन योजनेचे 24.3 दशलक्षाहून अधिक लाभार्थी आहेत, ज्या अंतर्गत लाभार्थ्यांच्या खात्यात 1,500 चा मासिक रोख लाभ जमा केला जातात. ज्यासाठी राज्य सरकार दरमहा 3,700 कोटी खर्च करते.
मुख्यमंत्री म्हणून आपल्या पहिल्या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी जातनिहाय सर्वेक्षणाच्या शक्यतेबद्दलही वक्तव्य केले. आपले सरकार या कल्पनेच्या विरोधात नसल्याचे ते म्हणाले. “बिहारमधील जाती-आधारित सर्वेक्षणाचे समर्थन केले आहे आणि त्याच्या विरोधात नाही. परंतु ते ओबीसींना बाधा आणत असल्याने ते शस्त्र बनवू नये. जात-आधारित सर्वेक्षण करण्याच्या हेतूबद्दल स्पष्टता असली पाहिजे,” ते पुढे म्हणाले.