Kyarr Cyclone: मुंबईसह राज्यात जोरदार पावसाचा अंदाज; किनारपट्टीवरील वाऱ्याचा वेग 65 किलोमीटपर्यंत जाण्याची शक्यता
त्यामुळे भारताला ‘क्यार’ नावाचे चक्रीवादळाचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ राज्याच्या किनारपट्टीपासून 190 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे येत्या 24 तासांत मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस पडेल. तसेच राज्याच्या उर्वरित भागांतदेखील हवामान विभागाने पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
Kyarr Cyclone: अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे भारताला ‘क्यार’ (Kyarr Cyclone) नावाचे चक्रीवादळाचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ राज्याच्या किनारपट्टीपासून 190 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे येत्या 24 तासांत मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस पडेल. तसेच राज्याच्या उर्वरित भागांतदेखील हवामान विभागाने पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग ताशी 65 किलोमीटपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. शनिवारपासून हे चक्रीवादळ पश्चिमेकडे अरबी समुद्रातून ओमानच्या दिशेने सरकण्याचे संकेत आहेत.
'क्यार' चक्रीवादळामुळे रविवार दुपारपर्यंत समुद्र प्रचंड खवळलेला असणार आहे. त्यामुळे मच्छिमारांनी खोल समुद्रात जावू नये, असा इशारा तटरक्षक दलाने दिला आहे. तटरक्षक दलाकडून समुद्रात अडकलेल्यांना सुखरूप किनारपट्टीवर आणण्यासाठी काम सुरू आहे. त्यासाठी विशेष जहाजे व हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहेत. केरळ, तामिळनाडू, गुजरात, कर्नाटक राज्यातील अनेक बोटी आश्रयासाठी कोकणातील सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या देवगड बंदरात आणल्या आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व बोटी देवगडमध्ये दाखल झाल्या आहेत.
हेही वाचा - मुंबईत पडत असलेल्या पावसामुळे हवामान खात्याकडून Yellow Alert जाहीर
अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील विविध ठिकाणी गेल्या आठवड्यापासून पाऊस सुरू आहे. क्यार चक्रीवादळ शुक्रवारी रत्नागिरीपासून 190 किलोमीटर तर मुंबईपासून 340 किलोमीटरवर अंतरावर होते. त्यामुळे किनारपट्टीलगतच्या भागांमध्ये सोसाटय़ाचा वारा वाहत आहे. येत्या 24 तासांत कोकण, गोवा, कर्नाटकात मुसळधार, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पावसाची शक्यता आहे.
येत्या 5 दिवसांत क्यार चक्रीवादळ ओमानच्या किनारपट्टीला धडक देईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच 27 ऑक्टोबरनंतर क्यार चक्रीवादळाचा प्रभाव कमी होईल.