Kurla BEST Bus Mishap: कुर्ला बेस्ट बस चालक संजय मोरे अपघाताच्या वेळेस दारूच्या नशेत नव्हता - Forensic Report
यावेळी बस नियंत्रित झाली आणि त्यामध्ये 7 जणांचा मृत्यू तर 42 जण जखमी झाले आहेत. संजय मोरे बेस्टची इलेक्ट्रिक बस चालवत होता.
कुर्ला बेस्ट बस अपघातामधील बस चालक संजय मोरे (Sanjay More) याचा फॉरेंसिक रिपोर्ट () समोर आला आहे. 9 डिसेंबरच्या रात्री चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि त्या बसच्या धडकेत 7 जणांचा हकनाक बळी गेल्यानंतर आता बेस्ट बसच्या सुरक्षेवर प्रश्न विचारले जात आहेत. अपघाताचं कारण शोधताना चालक मद्यधुंद अवस्थेमध्ये होता का? याचा देखील विचार केला जात आहे. 54 वर्ष बसचालक मोरे च्या रक्तात मद्य नसल्याचं समोर आलं आहे.
फ्री प्रेस जर्नल च्या वृत्तानुसार, डेप्युटी कमिशनर गणेश गावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार 14 डिसेंबरला Kalina Forensic Laboratory कडून संजय मोरेंचा फॉरेंसिक रिपोर्ट मिळाला आहे आणि तो निगेटिव्ह आहे. चालकात रक्तात मद्य सेवनाचा पुरावा आढळलेला नाही. नक्की वाचा: Ghatkopar Bus Accident: घाटकोपर मध्ये बेस्ट बसच्या धडकेत 25 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू .
संजय मोरे चालवत असलेली बस कुर्ला मधून अंधेरीला जात होती. यावेळी बस नियंत्रित झाली आणि त्यामध्ये 7 जणांचा मृत्यू तर 42 जण जखमी झाले आहेत. संजय मोरे बेस्टची इलेक्ट्रिक बस चालवत होता.
पोलिसांच्या माहितीनुसार, संजय मोरे ला 30 वर्षांचा चालक म्हणून अनुभव आहे. तो डिझेल बस चालवत होता. पहिल्यांदाच त्याच्या हातात इलेक्ट्रिक गाडी आली होती. वेगात असताना गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि ती रस्त्यावरील गाड्या आणि पादचार्यांना उडवून गेली. अपघाताच्या वेळी तिचा वेग 60 किमी प्रतितास होता. यावेळी कुर्ला परिसरात चिंचोळ्या रस्त्यावर उभ्या असलेल्या अन्य गाड्यांना ती धडकली.