GST भवनाला लागलेल्या आगीत स्वत:चा जीव धोक्यात घालून राष्ट्रध्वज सुखरुप आणणारे शिपाई कुणाल जाधव यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सत्कार

यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण उपस्थित होते.

Cm Uddhav Thackeray honoured kunal Jadhav (PC - Twitter)

मुंबईतील GST भवनला लागलेल्या आगीत जीवाची पर्वा न करता पेटत्या इमारतीचे 9 मजले चढून जाऊन राष्ट्रध्वज सुखरूप आणणारे शिपाई कुणाल जाधव (Kunal Jadhav) यांचा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कुणाल जाधव हे जीएसटी भवनला शिपाई म्हणून कार्यरत आहेत. जीएसटी भवनाला आग लागली तेव्हा कुणाल जाधव तळमजल्यावर होते. बचावकार्य सुरू असताना इमारतीवरील तिरंगा तसाच असल्याचे जाधव यांच्या निदर्शनास आले होते. कुणाल यांनी आगीतून राष्ट्रध्वज वाचवण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावली आणि तिरंगा सुखरूप खाली आणला. त्यांच्या या शौर्याचे सर्वत्र कौतूक होत आहे. (हेही वाचा - देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात केलेल्या 33 कोटी वृक्ष लागवडीची चौकशी होणार)

कुणाल जाधव यांच्या शौर्याची बातमी वाचल्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून त्यांची प्रशंसा केली होती. आज मुंबईत आल्यानंतर चव्हाण यांनी कुणाल जाधव यांना ‘सह्याद्री’वर बोलावून घेतलं. तसेच मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीही जाधव यांचा परिचय करून दिला. यावेळी कुणाल यांचा शाल आणि श्रीफळ तसेच शिवाजी महाराजांची प्रतीमा देऊन सन्मान करण्यात आला.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif