Konkan Railway Recruitment 2022: कोकण रेल्वेमध्ये नोकरीची संधी; 10 पासून सुरू होणार मुलाखती
यासाठी कश्मीर मध्ये मुलाखती घेतल्या जाणार आहेत.
कोकण रेल्वेमध्ये (Konkan Railway) काम करू इच्छिणार्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कोकण रेल्वेकडून नुकतीच Sr. Technical Assistant (Civil),आणि Jr. Technical Assistant (Civil) या पदांसाठी नोकरभरतीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. दरम्यान ज्या उमेदरावरांना यासाठी अर्ज करायचा आहे त्यांना konkanrailway.com या कोकण रेल्वेच्या अधिकृत वेबसाईट वर माहिती दिली जाणार आहे. दरम्यान या नोकरभरती मधून 26 पदांवर नोकरभरती होणार आहे. यासाठी वॉक इन इंटरव्ह्युज 10 मे 2022 पासून सुरू होणार आहेत.
मुलाखतीच्या तारखा, वेळ काय?
Sr. Technical Assistant (Civil)
रिपोर्टिंग वेळ - 09:30 to 13.30
OBC, ST, SC जातीच्या उमेदवारांच्या मुलाखती - 10 मे
जनरल कॅटेगरीच्या उमेदरवारांच्या मुलाखती - 11 मे
Jr. Technical Assistant (Civil)
रिपोर्टिंग वेळ - 09:30 to 13.30
OBC, ST, SC जातीच्या उमेदवारांच्या मुलाखती - 12 मे
जनरल कॅटेगरीच्या उमेदरवारांच्या मुलाखती - 13 मे , 14 मे
कोकण रेल्वेच्या अधिकृत नोटिफिकेशन पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
ज्युनियर आणि सिनियर टेक्निकल असिस्टंट पदांसाठी प्रत्येकी 13-13 जागांवर नोकरभरती होणार आहे. यासाठी कश्मीर मध्ये मुलाखती घेतल्या जाणार आहेत. यासाठी उमेदवाराकडे सिव्हिल इंजिनियरिंग मध्ये बीई/बीटेक पदवी आवश्यक आहे. किमान 60% गुण आवश्यक आहेत. Sr.Technical Assistant पदासाठी 2 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.