Kolhapur Shocker: कोल्हापूरमध्ये करणीच्या संशयातून शेजारच्याने केले जीवघेणे वार; एकाचा मृत्यू
आझादच्या मानेवर वार केले. घरातील व्यक्तींनी आरडाओरड केल्यानंतर निखिल निघून गेला पण तो पर्यंत 7-8 वार झालेले असल्याने आझादचा मृत्यू झाला.
करणी केल्याच्या संशयामधून खून झाल्याचा प्रकार समोर आला आहे. कोल्हापूर मधील ही घटना आहे. टेंबलाई उड्डण पूलाच्या आसपास बीएसएनएल टॉवरच्या शेजारी असलेल्या झोपडपट्टी मध्ये हा प्रकार घडला आहे. मृत व्यक्तीचं नाव आझाद मुकबुल मुलतानी आहे. आझाद याचं वय 48 वर्षीय आहे. दरम्यान 22 वर्षीय निखिल गवळी याने ही हत्या केली आहे. निखिलने स्वतः हत्येची कबुली देत राजारामपुरी पोलिस ठाण्यात स्वतःअला सरेंडर केले आहे.
निखिल हा टेम्पो चालक आहे. पोलिसांच्या माहितीनुसार त्याने हा खून करणी करत असल्याच्या संशयामधून केला आहे. आझाद वर वार करत असताना त्याला वाचवण्यासाठी धावलेली त्याची सून अफसाना असिफ मुलतानी देखील जखमी झाली आहे. अफसानाला नजिकच्या रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
निखिल गवळी याला व्यसनं आहेत. तो राहत असलेल्या वस्तीच्या चौकात राहणार्या नागरिकांना शिवीगाळ करणे, अंगावर धाऊन जाणे असे प्रकार करतच होता. स्थानिक देखील त्याच्या या कृतीला वैतागले होते. Mankhurd Murder Case: मुंबईच्या मानखुर्द भागात 22 वर्षीय तरूणाचा मृतदेह आढळला रक्ताच्या थारोळ्यात; अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल.
मंगळावारी रात्री साठेआडच्या सुमारास आझाद त्याच्या कुटुंबासह जेवायला बसलं होतं. बाहेरच्या खोलीत आझाद, त्यांची पत्नी रेहाना, सून आयेशा, अफसाना आणि एक लहान मुलगा एकत्रित जेवत होते. त्यावेळी नशेत असलेला निखिल अचानक छोटी तलवार घेऊन घरात घुसला. त्याने आझादच्या मानेवर वार केले. घरातील व्यक्तींनी आरडाओरड केल्यानंतर निखिल निघून गेला पण तो पर्यंत 7-8 वार झालेले असल्याने आझादचा मृत्यू झाला.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)