कोल्हापूर मधील शाळांना 16 ऑगस्ट पर्यंत सुट्टी, पावसाचा जोर ओसरला तरी जनजीवन विस्कळीत
तसेच पुराचे कार्य सुरळीत होईपर्यंत जिल्ह्यात बंदीची सूचना देखील प्रशासनाने दिली आहे.
कोल्हापूर (kolhapur) मध्ये मागील आठवड्यात पावसाने थैमान घातल्यावर ठिकठिकाणी पूर येऊन नागरिकांची दैना झाली होती. आता पावसाचा वेग मंदावल्याने पुराचे पाणी वेगाने ओसरत आहे. असं असलं तरी जनजीवन अद्याप पूर्णपणे पूर्वपदावर आलेले नाही. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा 16 ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी दौलत देसाई (Daulat Desai) यांनी अधिकृत पत्रकाद्वारे आज जाहीर केला आहे. तसेच पुरा नंतर बचावकार्य सुरु असल्याने 24 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात बंदीची सूचना देखील प्रशासनाने दिली आहे.
पहा ट्विट
दरम्यान, पावसाने थोडीशी विश्रांती घेतल्याने कोल्हापूर जिल्हा पुराच्या संकटातून हळूहळू सावरत आहे. पावसामुळे राष्ट्रीय महामार्ग 4 (NH-4) वरील वाहतूक गेल्या 8 दिवसांपासून बंद ठेवण्यात आली होती. मात्र आता पावसाचा जोर कमी झाला असल्याने आवश्यक वस्तूंच्या दळणवळणासाठी अवजड वाहनांसाठी हा महामार्ग पुन्हा सुरु करण्यात आला आहे.