Kolhapur Rain Updates: कोल्हापूरात पंचगंगेची पातळीत वाढ, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
त्यामुळे इशारा पातळीच्या जवळ नदीचे पाणी पोहोचले आहे. पंचगंगेची धोका पातळी 43 फूट एवढी आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात (Kolhapur District) गेल्या पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडत आहे. धरण क्षेत्रात अतिवृष्टीची नोंद होत असून पुन्हा एकदा पंचगंगा नदीची (Panchganga River) पातळी वाढू लागली आहे. हवामान विभागाकडून कोल्हापूर जिल्ह्यासाठी ऑरेन्ज अलर्ट दिलेला आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 36 फुटांवरून वाहत आहे. पंचगंगा नदीच्या पातळीत सतत वाढ होत आहे. त्यामुळे कोल्हापुर जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. (हेही वाचा - Irshalwadi Landslide: मृतांची संख्या 22 वर , NDRF ची शोधमोहीम सुरुच)
पंचगंगेची पाणीपातळी सध्या 36 फूट असून इशारा पातळी 39 फूट आहे. त्यामुळे इशारा पातळीच्या जवळ नदीचे पाणी पोहोचले आहे. पंचगंगेची धोका पातळी 43 फूट एवढी आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील नऊ प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. अशी परिस्थिती असताना कोल्हापूर जिल्ह्याला आज हवामान खात्याने ऑरेन्ज अलर्ट दिला आहे.
दरम्यान राज्यात पुढील २४ तासात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, पुणे, सातारा, नाशिक व यवतमाळ या जिल्ह्यात रेड आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले आहे. दक्षिण भागात देखील मुसळधार पावसाने कहर केला आहे. पुढील तीन दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.