कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ: धनंजय महाडिक विरुद्ध संजय मंडलिक संघर्षात सतेच उर्फ बंटी पाटील किंगमेकर

लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर मतदारसंघात प्रामुख्याने तीन गट महत्त्वाचे मानले जातात. त्यापैकी एक महाडिक गट, दुसरा मंडलीक गट आणि तिसरा डी. वाय. पाटील किंवा सतेज उर्फ बंटी पाटील गट. सध्यास्थितीत महाडिक गटाविरोधात मंडलीक आणि सतेज उर्फ बंटी पाटील गट एकत्र आले आहेत. त्यामुळे इथले स्थानिक राजकारण बरेच बतलले आहे. असा स्थितीत विजय संपादन करण्यासाठी धनंजय उर्फ मुन्ना महाडिक यांना जोरदार प्रयत्न करावे लागतील असे, स्थानिक राजकीय विश्लेशक सांगतात.

Satej Patil, Dhananjay Mahadik,Sanjay Mandlik | (File Image)

Lok Sabha Elections 2019: कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ (Kolhapur Lok Sabha Constituency) म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील पुरोगामी विचारांचा वारसा असलेला मतदारसंघ होय. मतदारसंघाच्या स्थापनेपासून शेकाप (SKP) चा अपवाद वगळता हा मतदारसंघ हा काँग्रेस आणि काँग्रेसी विचारसरणीशी साधर्म्य असणाऱ्या पक्षांसोबत राहिला आहे. 2014 मध्ये आलेल्या काँग्रेस विरोधी लाटेतही या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धनंजय उर्फ मुन्ना महाडिक (Shiv Sena) विजयी झाले. त्यांनी शिवसेना उमेदवार प्रा. संजय मंडलीक (Sanjay Mandlik) यांचा पराभ केला होता. लोकसभा निवडणूक 2019 साठी आताही विद्यमान खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक आणि शिवसेना उमेदवार प्रा. संजय मंडलीक यांच्यातच काट्याची टक्कर आहे. वंचित बहुजन आघाडीनेही इथे उमेदवार दिला आहे. मात्र खरी लढत महाडिक विरुद्ध मंडलीक अशीच दिसते आहे.  (हेही वाचा, महाराष्ट्राचे राजकारण ढवळून टाकणारे बहुचर्चीत लोकसभा मतदारसंघ आणि लक्ष्यवेधी लढती)

2014 मध्येही धनंजय उर्फ मुन्ना महाडिक आणि प्रा. संजय मंडलिक यांच्यात काट्याची टक्कर झाली. मात्र, तरीही काटावरच्या बहुमताने धनंजय महाडिक हे या मतदारसंघातून विजयी झाले. आता परिस्थिती बदलली आहे. 2014 मध्ये मतदारांच्या मनात असलेला तीव्र काँग्रेस विरोध बराचसा शिथिल झाला असला आणि विद्यमान भाजप सरकारविरोधात अँन्टीइन्क्बंन्सी असली तरी, स्थानिक राजकारण विजयाचा गुलाल ठरवणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर मतदारसंघात प्रामुख्याने तीन गट महत्त्वाचे मानले जातात. त्यापैकी एक महाडिक गट, दुसरा मंडलीक गट आणि तिसरा डी. वाय. पाटील किंवा सतेज उर्फ बंटी पाटील गट. सध्यास्थितीत महाडिक गटाविरोधात मंडलीक आणि सतेज उर्फ बंटी पाटील गट एकत्र आले आहेत. त्यामुळे इथले स्थानिक राजकारण बरेच बतलले आहे. असा स्थितीत विजय संपादन करण्यासाठी धनंजय उर्फ मुन्ना महाडिक यांना जोरदार प्रयत्न करावे लागतील असे, स्थानिक राजकीय विश्लेशक सांगतात.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात येणारे विधानसभा मतदारसंघ

·         चंदगड विधानसभा मतदारसंघ

·         राधानगरी विधानसभा मतदारसंघ

·         कागल विधानसभा मतदारसंघ

·         कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ

·         करवीर विधानसभा मतदारसंघ

·         कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ

राजर्षी शाहू महाराज यांचे विचार आणि दूरदृष्टीचा वारसा सांगणारा हा जिल्हा आणि पर्यायाने मतदारसंघसुद्धा. या मतदारसंघाचे आजवरचे वैशिष्ट्य असे की, भाजप, शिवसेना किंवा इतर कोणत्याही हिंदुत्त्ववादी पक्ष किंवा संघटनेला हा मतदारसंघ जिंकता आला नाही. 1980 ते 1998 दिवंगत उदयसिंहराव गायकवाड हे काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर या मतदारसंघातून सातत्याने निवडूण येत असत. पुढे या मतदारसंघाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला संधी दिली. येथून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तिकाटावर दिवंगत सदाशिवराव मंडलिक हे निवडूण आले. सदाशिवराव मंडली यांनी 1998 ते 2009 या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधित्त्व केले. पुढे शरद पवार यांच्याशी मतभेद झाल्यानंतर सदाशिव मंडलिक हे राष्ट्रवादी काँग्रेस मधून बाहेर पडले. 2009 मध्ये त्यांनी लोकसभेची निवडणूक अपक्ष लढवली आणि ते निवडूण आले. मंडलीक यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाने 2014 मध्ये धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली आणि ते निवडूण आले.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now