Rajaram Sugar Factory: राजाराम कारखाना सभासद अपात्र प्रकरणी महाडीक गटाला धक्का, निकाल सतेज पाटील यांच्या बाजूने
प्रादेशिक सहसंचालक (साखर) द्वारा देण्यात आलेल्या आगोदरच्या निर्णयाला सतेज पाटील (Satej Patil) यांनी न्यायालयात आव्हान दिले होते.
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडली आहे. छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना सभासद (Chhatrapati Rajaram Sakhar karkhana, Kolhapur) अपात्रता प्रकरणी धनंजय महाडिक गटाला जोरदार धक्का बसला आहे. प्रादेशिक सहसंचालकांनी (साखर) दिलेला निर्णय महाडिकगटाविरोधात गेला आहे. प्रादेशिक सहसंचालक (साखर) द्वारा देण्यात आलेल्या आगोदरच्या निर्णयाला सतेज पाटील (Satej Patil) यांनी न्यायालयात आव्हान दिले होते.
सहकार मंत्र्यांनी व नंतर उच्च न्यायालयाकडून निर्णय कायम ठेवल्यानंतर मात्र त्यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. त्यानंतर सुप्रिम कोर्टाने हे प्रकरण पुन्हा एकदा प्रादेशिक सहसंचालकाकडे तपासणीसाठी परत पाठवले. त्यावर सहसंकालकांनी सभासदनिहाय माहिती गेऊन दोन महिने सखोल तपास केला. त्यानंतर त्यातील 1272 सभासद अपात्र ठरवले. महाडिक गटाने बनावट कागदपत्रांच्या आधारे सभासद वाढविल्याचा सतेज पाटील गटाचा दावा होता.
सतेज पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, महाडिक गटाने नियमबाह्य काम करत बनावट कागदपत्रांचा आधार घेत सभासद संख्या वाढवली होती. त्याच्या विरोधातच आम्ही दाद मागितली होती. तसेच, हे नियमबाह्य सभासद अपात्र करावेत अशी मागणी केली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने सहसंचालकांनी दोन महिन्यांनी अहवाल सादर केला ज्यात या सभासदांना अपात्र ठरवले.
छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीत आम्हाला महाडिक गटाच्या बरोबरीत मते मिळाली. काही किरोळ मते कमी पडली. मात्र, बेकायदेशीरपद्धीने सभासद संख्या वाढवल्याने विरोधी गटाचा विजय झाला. मात्र, आम्ही कारखाना खऱ्या सभासदांकडे जावा यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. त्यासाठीच आमचा लढा होता. अखेर सत्य बाहेर आले आहे. आमचा लढा यापुढेही सुरुच राहणार असल्याचे सतेज पाटील यांनी म्हटले आहे.