Kohinoor Mills Case: सक्तवसुली संचालनालय अधिकाऱ्यांकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तब्बल 8 तास 46 मनिटे चौकशी
ईडी कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे हे प्रसारमाध्यमांशी काय बोलतात याबबत उत्सुकता होती. चौकशीला गेल्यानंतर दोन ते अडीच तासात राज ठाकरे यांची मुक्तता केली जाईल अशी आपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, सकाळी साडेआकरा वाजलेपासून सायंकाळी 7 वाजेपर्यंत त्यांना ईडी कार्यालयात चौकशीसाठी थांबावे लागले. त्यामुळे प्रकरणातील उत्सुकता ताणली गेली होती.
कोहिनुर मिल प्रकरण: सक्तवसुली संचालनालय (Enforcement Directorate) अर्थातच ईडी (ED) कार्यालयात आज (गुरुवार, 22 ऑगस्ट 2019) सुरु असलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांची चौकशी अखेर संपली. त्यामुळे राज ठाकरे हे ईडी कार्यालयाबाहेर पडले. 'कोहिनुर स्क्वेअर' (Kohinoor Square) प्रकरणात सकाळी साडेआकरा वाजलेपासून सायंकाळी 8 वाजून 16 मिनिटांपर्यंत म्हणजे तब्बल 8 तास 46 मनिटे इतका प्रदीर्घ काळ राज ठाकरे यांची चौकशी सुरु होती. त्यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील प्रसारमाध्यमं आणि नागरिकांना या चौकशीतून काय बाहेर येतं याबाबत उत्सुकता होती. दरम्यान, या चौकशीतील तपशील अद्याप बाहेर आला नाही.
ईडी कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे हे प्रसारमाध्यमांशी काय बोलतात याबबत उत्सुकता होती. मात्र, प्रसारमाध्यमांशी कोणताही संवाद न साधता राज ठाकरे आपल्या कुटुंबीयांसोबत मार्गस्थ झाले. त्यामुळे ही उत्सुकता कायम राहिली. चौकशीला गेल्यानंतर दोन ते अडीच तासात राज ठाकरे यांची मुक्तता केली जाईल अशी आपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, सकाळी साडेआकरा वाजलेपासून साधारण रात्री सव्वाआठ वाजेपर्यंत त्यांना ईडी कार्यालयात चौकशीसाठी थांबावे लागले. त्यामुळे प्रकरणातील उत्सुकता ताणली गेली होती.
राज ठाकरे यांना 'कोहिनुर स्क्वेअर' (Kohinoor Square) प्रकरणात काही दिवसांपूर्वीच ईडीची नोटीस आली होती. या नोटीशीला प्रतिसाद देत राज ठाकरे आज (22 ऑगस्ट 20198) ईडी कार्यालयात दाखल झाले. राज ठाकरे यांच्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना कार्यकर्त्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या होत्या. दरम्यान, मनसे कार्यकर्त्यांची खदखद आणि संतप्त भावना विचारात घेता कोणताही अनुचीत प्रकार घडू नये. यासाठी मुंबई पोलिसांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना नोटीसा पाठवल्या होत्या. तसेच, ईडी कार्यालय परिसरात जमावबंदी आदेश लागू केला होता. दरम्यान, मुंबई पोलिसांनी मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांना ताब्यातही घेतले आहे.
दरम्यान, मायानगरी मुंबईतील मध्यवर्थी असलेल्या दादर परिसरात 'कोहिनुर स्क्वेअर' या भव्य प्रकल्पातील गैरव्यवहाराप्रकरणी ईडीने राज ठाकरे कोहिनुर समूहाचे उन्मेष जोशी व राज यांचे भागीदार राजन शिरोडकर यांना नोटीस बजावली. या नोटीशीनंतर ईडीने उन्मेष जोशी यांची सोमवारी (19 ऑगस्ट 2019) सखोल चौकशी केली. ही चौकशी सुमारे साडेसात तास सुरु होती. जोशी यांची चौकशी मंगळवारी (20 ऑगस्ट 2019) रोजीही ही चौकशी सुरु होती. मंगळवारच्या चौकशीत उन्मेष जोशी यांच्यासोबत राजन शिरोडकरही उपस्थित होते. दरम्यान, राज ठाकरे यांना चौकशीसाठी ईडीने 22 ऑगस्ट ही तारीख दिली होती. त्यामुळे राज ठाकरे हे आज ( 22 ऑगस्ट) ईडीच्या कार्यालयात चौकशीला सामोरे गेले.
(The above story first appeared on LatestLY on Aug 22, 2019 08:26 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

