विधानसभा मतदार यादीत ऑनलाईन पद्धतीने ‘असं’ शोधा तुमचं नाव

ऑनलाईन पद्धतीने मतदारांना मतदार यादीत नाव आहे की, नाही याची माहिती एका क्लिकवर मिळू शकणार आहे.

Voting (Photo Credits: PTI)

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Elections 2019) 21 ऑक्टोबर रोजी म्हणजेच सोमवारी मतदान होत आहे. जास्तीत-जास्त मतदारांनी मतदान करावे यासाठी सरकारकडून मतदार जनजागृती होत आहे. तुम्हाला तुमचे नाव विधानसभा मतदार यादीत ऑनलाईन पद्धतीने शोधायचे असेल तर, तुम्हाला खालील पद्धत नक्की उपयोगात येतील. आता ऑनलाईन पद्धतीने मतदारांना मतदार यादीत (Voters List)  नाव आहे की, नाही याची माहिती एका क्लिकवर मिळू शकणार आहे. यंदा महाराष्ट्रात तब्बल ८.९५ कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये नव्या मतदारांची संख्याही जास्त असणार आहे. मतदानावेळी मतदारांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे हा सर्व गोंधळ होण्याआधीच तुम्ही ऑनलाईन पद्धतीने आपले मतदान केंद्र पाहू शकता.

अशी मिळवा मतदान केंद्राची माहिती -  

हेही वाचा - Maharashtra Assembly Election 2019 Voting Day: मतदानाच्या दिवशी कंपनी सुट्टी देत नसल्यास 'या' केंद्रावर करा थेट तक्रार

मतदानासाठी लागणारी कागदपत्रे –

प्रत्येक मतदाराला मतदान करताना सोबत ओळखपत्र असणे गरजेचे आहे. मतदाराकडे ओळखपत्र नसेल तर मतदार मतदान करू शकत नाही. भारतीय निवडणूक आयोगाने ग्राह्य ठरवलेल्या ओळखपत्रांच्या आधारे तुम्ही मतदानाचा हक्क बजावू शकता. यासाठी तुमच्याकडे खालील कागदपत्रांची आवश्यकता आहे.

मतदारांसाठी विशेष व्होटर हेल्पलाईन क्रमांक –

सरकारने मतदारांसाठी १९५० हा हेल्पलाईन क्रमांक जारी केला आहे. तुम्हाला यावर SMS करून माहिती मिळवता येणार आहे. तसेच याव्यतिरिक्त दिव्यांग मतदारांना ‘पीडब्ल्यूडी’ या ॲपचा वापर करता येणार आहे. यामध्ये दिव्यांग मतदारांना मतदान केंद्राचा शोध घेणं, व्हीलचेअरची मागणी करणं, मतदार नोंदणी करणं, आदी सुविधा दिल्या जाणार आहेत.