Kirtan World Record: कीर्तनकार ह.भ.प. बाजीराव महाराज बांगर यांचा अनोखा World Record, सलग 12 तास 20 मिनिटांचे केले कीर्तन
मात्र, आंबेगाव (Ambegaon) तालुक्यातील पिंपळगाव खडकी (Pimpalgaon Khadki) येथील प्रसिद्ध कीर्तनकार, शिवचरित्र कथाकार ह.भ.प. बाजीराव महाराज बांगर (Bajirao Maharaj Bangar) यांनी नारायणगाव येथे सलग 12 तास 20 मिनिटांचे कीर्तन करून वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियामध्ये नोंद केली आहे.
अनेक वर्ल्ड रेकॉर्ड (World record) आपण ऐकले किंवा पाहिले असतील. तथापि, कीर्तनावर वर्ल्ड रेकॉर्ड केल्याचे आपण ऐकलं नसेल. मात्र, आंबेगाव (Ambegaon) तालुक्यातील पिंपळगाव खडकी (Pimpalgaon Khadki) येथील प्रसिद्ध कीर्तनकार, शिवचरित्र कथाकार ह.भ.प. बाजीराव महाराज बांगर (Bajirao Maharaj Bangar) यांनी नारायणगाव येथे सलग 12 तास 20 मिनिटांचे कीर्तन करून वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियामध्ये नोंद केली आहे. नारायणगावचे सरपंच योगेश पाटे, जयहिंद ग्रुपचे सर्वेसर्वा विजय गुंजाळ, शिवसेना तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, रमेश भोसले यांच्या सहकार्यातून नारायणगाव येथील मुक्ताई मंगल कार्यालय येथे 14 जून रोजी सकाळी नऊ वाजता तुकाराम महाराजांच्या उपदेशपर प्रकरणातील तीन चरणांचा अभंग घेत कीर्तनाला प्रारंभ केला.
सलग 12 तास 20 मिनिटानंतर कीर्तन संपवून वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव कोरले. गेल्या 12 वर्षांपासून कीर्तन सेवा देणारे शिवचरित्र कथाकार ह.भ.प. बाजीराव महाराज बांगर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातून प्रेरणा घेतली. पावनखिंडीच्या लढाईत 17 तास खिंड लढविणाऱ्या मावळ्यांची लढाई हीच त्यांच्यासाठी प्रेरणा ठरली. 17 तास मावळे लढाई करू शकतात, तर आपणही 12 तास कीर्तन करू शकतो असा निश्चय केल्यावर त्यांनी हा विक्रम गाठला. हेही वाचा Pune: उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बंगल्यामधील झाडाच्या फांद्या तोडल्याप्रकरणी शेजाऱ्यावर गुन्हा दाखल
तुकाराम महाराजांच्या गाथ्यातील उपदेशपर प्रकरणातील 3 चरणाच्या अभांगवर समाज प्रबोधन करण्यासाठी त्यांनी विविध विषय निवडलले. व्यसन, छत्रपती शिवाजी महाराज, श्रीराम प्रभू, तुकाराम महाराज, मराठी भाषा सध्य स्थिती आदींचा यात समावेश होता.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)