Kirit Somaiya Korlai Visit: किरीट सोमय्या आज कोर्लई गावाला देणार भेट, ठाकरे परीवाराच्या कथीत बंगल्यांची करणार पाहणी

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या बंगल्यांबाबत आरोप केला आहे. याच प्रकरणात पाहणी करण्यासाठी किरीट सोमय्या हे आज कोर्लई गावात जाणार आहेत. त्यांनी स्वत:च प्रसारमाध्यमांना याबाबत माहिती दिली आहे.

Kirit Somaiya | (File Photo)

अलिबाग येथील कोर्लई गावात असलेल्या रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्या नावावरील कथीत बंगल्यावरुन राजकारण तापले आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या बंगल्यांबाबत आरोप केला आहे. याच प्रकरणात पाहणी करण्यासाठी किरीट सोमय्या हे आज कोर्लई गावात जाणार आहेत. त्यांनी स्वत:च प्रसारमाध्यमांना याबाबत माहिती दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांचे बंगले कोर्लई गावात असल्याचे किरीट सोमय्या वारंवार सांगत आहेत. सोमय्यांच्या आरोपांना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी वारंवार प्रत्युत्तर दिले आहे.

किरीट सोमय्या यांनी कोर्लई गावात जाणार असल्याचे जाहीर केले. दरम्यान, सोमय्या जर मुख्यमंत्र्यांची नाहक बदनामी करत असतील तर आम्ही त्यांना जशास तसे उत्तर देऊन असे शिवसेना आमदार महेंद्र दळवी (Mahendra Dalvi) यांनी म्हटले आहे. सोमय्या यांनी वास्तवतेवर आधारीत बोलावे. वस्तुस्थीती समजून घ्यावी. उगाचच हवेत आरोप करु नयेत असेही त्यांनी म्हटले आहे. दुसऱ्या बाजूला आदेश असेल तर शिवसेनेचा दणका काय असतो हे दाखवून देऊ असा थेट इशाराही आमदार भरत गोगावले यांनी दिला आहे. (हेही वाचा, Peru Baug Land Case: किरीट सोमय्या यांच्यावर संजय राऊत यांचा पेरुबाग जमीन घोटाळ्याचा आरोप, देवेंद्र फडणवीस यांना मात्र क्लिन चिट)

पाठीमागील काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या हे ठाकरे कुटुंबीयांवर वारंवार आरोप करत आहेत. त्यामुळे शिवसेना विरुद्ध किरीट सोमय्या असा वाद निर्माण झाला आहे. किरीट सोमय्या यांच्या आरोपाला शिवसेना खासदार संजय राऊत प्रत्युत्तर देत आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूंनी जोरदार आरोप प्रत्यारोप होत आहेत. आता दोन्हीकडील बाजू आरोप प्रत्यारोपांवरच समाधान मानणार की त्यातील वास्तवताही जनतेसमोर मांडणार याबाबत प्रचंड उत्सुकता आहे.