PMC Bank Scam: किरीट सोमय्या यांना पीएमसी बँक घोटाळ्याचा फायदा? संजय राऊत यांनी काय म्हटले पाहा

आजही त्यांनी पंजाब अॅण्ड महाराष्ट्र बँक (PMC Bank Scam) घोटाळा प्रकरणारुन ईडी आणि भाजप नेते किरीट सोमय्या ( Kirit Somaiya) यांच्यावर निशाणा साधला आहे.

Sanjay Raut | (File Image)

शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपली आक्रमकता कायम ठेवली आहे. आजही त्यांनी पंजाब अॅण्ड महाराष्ट्र बँक (PMC Bank Scam) घोटाळा प्रकरणारुन ईडी आणि भाजप नेते किरीट सोमय्या ( Kirit Somaiya) यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून पीएमसी घोटाळ्याची क्रोनोलॉजीच सांगितली आहे. थेट आकडेवारी देत संजय राऊत यांनी सोमय्या यांच्यासोबतच ईडीवरही जोरदार निशाणा साधला आहे.

संजय राऊत यांनी ट्विटरवर पीएमसी बँक घोटाळ्याबाबत थेट आकडेवारी दिली आहे. या आकडेवारीत राऊत यांनी पीएमसी घोटाल्याचा मास्टरमाईंड हा राकेश वाधवान हा असल्याचे म्हटले आहे. तसेच, राकेश वाधवान यांनी 2015-16 मध्ये देवेंद्र लधानी नामक व्यक्तीच्या बँक खात्यात 4.15 कोटी रुपये जमा केले. लधानी हता किरीट सोमय्या यांचा व्यावसायिक भागिदार आहे. त्यामुळे पीएमसी बँक घोटाळ्याचा किरीट सोमय्या यांना फायदा झाला असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. या घोटाळ्याचा तपास ईडीकडे आहे. असे असताना इडीने अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई न करता नील सोमय्या आणि मेधा सोमय्या यांना अटक का नाही केली, असा सवालही राऊत यांनी विचारला आहे. (हेही वाचा,Kirit Somaiya वर टीका करणात Sanjay Raut यांची जीभ घसरली; म्हणाले, 2024 नंतर सोमय्यासारखे चु... लोक देशात राहणार नाहीत )

ट्विट

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पाठीमागच्या आठवड्यात जाहीर पत्रकार परिषद घेत केंद्रीय तपास यंत्रणांवर जोरदार टीकास्त्र सोडले होते. केंद्रीय तपास यंत्रणा या खंडीणीखोर बणल्या आहेत. त्यांनीक महाराष्ट्राला लुटत कोट्यवधींची अफरातफर केली आहे. आपण लवकरच याची माहीतीही उघड करणार असल्याचा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. ज्यांना कुणाला आमच्या अंगावर याचचे आहे त्यांनी यावे. आम्ही घाबरत नाही. जे अंगावर येतील त्यांना तोंड काळे करुन जावे लागेल. आम्ही लवकरच ईडीचा सर्वात मोठा घोटाळा याच ठिकाणी बाहेर काढणार आहोत, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत यांनी पाठीमागील आठवड्यात शिवसेना भवन येथे ही पत्रकार परिषद घेतली होती.