मुंबई पोलिस आयुक्तांच्या बदलीनंतर किरीट सोमय्या, आशिष शेलार यांच्यासह अन्य भाजप नेत्यांच्या प्रतिक्रीया
राज्यात मागील काही दिवसांपासून गाजत असलेल्या उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली कार सापडणं आणि त्या कारचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू या प्रकरणी एपीआय सचिन वाझे चर्चेत आले.
उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली कार सापडणं आणि त्या कारचे मालक मनसुख हिरेन (Mansukh Hiren) यांचा संशयास्पद मृत्यू हे प्रकरण राज्यात मागील काही दिवसांपासून गाजत आहे. या प्रकरणी एपीआय सचिन वाझे (API SachinVaze) चर्चेत आले. सचिन वाझे यांच्या अटक आणि निलंबनानंतर आता मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी हेमंत नगराळे (Hemant Nagrale) यांची पोलिस आयुक्तपदी वर्णी लागली आहे. त्यानंतर भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar), किरीट सोमय्या (Kirit Somaiya), अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी ट्विटच्या माध्यमातून आपल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. तर देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी वेगवेगळ्या मागण्या केल्या आहेत. (Hemant Nagrale मुंबई चे नवे पोलिस आयुक्त; Param Bir Singh यांची गृह रक्षक दलात बदली; अनिल देशमुख यांनी जाहीर केले हे 4 बदल)
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची 'ही' मागणी:
"परमबीर सिंग यांची बदली ही वरवरची मलमपट्टी आहे. त्यामुळे मोठी कारवाई केल्याचा आव ठाकरे सरकारने आणू नये. राज्यातील कायदा सुव्यवस्था धोक्यात आली असून या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारवी आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घ्यावा," अशी मागमी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
किरीट सोमय्या ट्विट:
किरीट सोमय्या यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, परमबीर सिंह यांची बदली करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मनसुख हिरेन, अँटिलिया प्रकरण, सचिन वाझे प्रकरण दडपू करु इच्छित आहेत. ठाकरे सरकारच्या वाझे गँग अगदी आपीएस अधिकाऱ्यांसह सर्वांविरोधात कारवाई करण्याची आमची मागणी आहे.
आशिष शेलार ट्विट:
हे जे काही झाले ते मुंबई पोलिसांचे खच्चीकरण आणि बदनामी करणारे आहे. हे ठाकरे सरकारचे पाप असल्याचे आशिष शेलार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
अतुल भातखळकर ट्विट:
परमबीर सिंह यांच्या निलंबनाची मागणी अतुल भातखळकर यांनी केली आहे.
सचिन वाझे प्रकरणानंतर मुंबई पोलिस आयुक्तांच्या बदलीची मागणी भाजप नेते करत होते. दरम्यान, बदलीनंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन या संपूर्ण प्रकरणावर मुद्देसुद माहिती सादर करत मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणाची चौकशी देखील एनआयए कडे सोपवण्यात यावी, अशी मागणी केली आहे.