Kirit Somaiya Vs Mayor Kishori Pednekar: मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांनी SRA प्रकल्पामधील फ्लॅट बळकवल्याच्या भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा आरोप
भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya ) यांनी किशोरी पेडणेकरांवर वरळी मधील एसआरए प्रोजेक्टमधील इमरतीमधील फ्लॅट बळकावल्याचा आरोप लावला आहे.
मुंबई मध्ये काही दिवसांपूर्वी बीएमसीने (BMC) कार्यतत्परता दाखवत कंगनाच्या कार्यालयावर तोडक कारवाई केल्यानंतर मुंबईच्या भाजपा नेत्यांकडून शिव सेना नेत्यांसोबत शाब्दिक चकमकी सुरू आहेत. दरम्यान अनेकांनी शिवसेनेच्या मुंबईतील इतर अवैध बांधकामाकडे बीएमसी का दुर्लक्ष करतेय इथपासून ते अनिल परबांवरही (Anil Parab) अवैध बांधकामाचे आरोप लावण्यात आले. यामध्ये आता मुंबई महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनादेखील खेचण्यात आले आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya ) यांनी किशोरी पेडणेकरांवर वरळी मधील एसआरए प्रोजेक्टमधील इमरतीमधील फ्लॅट बळकावल्याचा आरोप लावला आहे.
किरीट सोमय्या यांनी ट्वीटरवर एक पोस्ट करत करत, 'वरळी मधील गोमाता जनता SRA Society मध्ये अवैध रित्या इमारत 2 मध्ये रहिवासी फ्लॅट आणि इमारत 1 मध्ये ऑफिस (Kis Corporate Services) थाटल्याचा आरोप केला आहे. हा प्रकल्प झोपडापट्टी पुनरविकास प्रोजेक्ट साठी व्यक्तींसाठी होता. सध्या SRA project बीएमसी कडे आहे. असे देखील त्यांनी म्हटले आहे.
किरीट सोमय्या ट्वीट
दरम्यान काल (11 सप्टेंबर) मुंबईच्या रूग्णालयात किशोरी पेडणेकर कोविड 19 च्या उपचारासाठी दाखल आहेत. मात्र या परिस्थितीत एबीपी माझाशी बोलताना त्यांनी प्रतिक्रिया देताना आरोप फेटाळून लावले आहेत. त्या तिथे भाड्याने राहत आहेत. ऑफिसदेखील भाडेतत्त्वावर आहे. तुम्ही आरोप सिद्ध करू शकलात तर मी शिक्षा भोगायला तयार आहे असं म्हटलं आहे.
काही दिवसांपूर्वी त्यांनी अनिल परब यांचा वांद्रे पूर्व येथील कार्यालयाची देखील अवैध बांधकामाबद्दलची व्हिडिओ पोस्ट केली होती.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)