Kidnapping And Selling Case: अंबरनाथ येथे अडीच वर्षीय मुलाचे अपहरण करून चक्क 70 हजारांना विकले; एका महिलेसह 5 जणांना अटक
ही घटना अंबरनाथ (Ambernath) येथील सर्कस मैदान परिसरातील येथे घडली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी एका विवाहित ग्राहक महिलेसह 5 जणांना अटक करण्यात आली आहे.
अडीच वर्षाच्या मुलाचे अपहरण करून त्याला 70 हजार रुपयांत विकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना अंबरनाथ (Ambernath) येथील सर्कस मैदान परिसरातील येथे घडली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी एका विवाहित ग्राहक महिलेसह 5 जणांना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलगा आपल्या घराजवळ खेळत असताना अचानक गायब झाला होता. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी कसून चौकशी करत मुलाचा शोध घेतला. तसेच आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मात्र, या घटनेने संपूर्ण अंबरनाथ परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.
पूजा शेट्टीयार (28), जयनतबी खान (33), शेरू सरोज (45), मुकेश खारवा (36) आणि माया काळे (30) असे या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत. लिलिया मंडळ असे गायब झालेल्या मुलाच्या आईचे नाव आहे. लिलिया या अंबरनाथ पश्चिम भागातील भाजी मार्केटजवळील नगरपालिकेच्या सर्कस मैदानावर झोपडपट्टीत गेल्या 3 वर्षांपासून राहत आहेत. मात्र, 15 सप्टेंबर रोजी त्यांचा मुलगा विकास भावंडासोबत खेळत असताना अचनाक गायब झाल्याची तक्रार त्यांनी अंबरनाथ पोलीस ठाण्यात दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे. पूजा शेट्टीयार नावाच्या महिलेने विकासची खरेदी केल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. त्यानुसार, पोलिसांनी पूजा हिचे चौकशी केली. पोलिसांनी खाक्या दाखवताच विकसला सर्कस मैदान परिसरातील जयनतबी मोहम्मद खान या महिलेकडून 70 हजार रुपयांत विकत घेतल्याची कबुली पूजा हिने दिली. हे देखील वाचा- Maharashtra Bans Sale of Loose Cigarettes and Bidis: महाराष्ट्रात सुटी सिगरेट आणि बिडी विक्रीवर बंदी
मागील काही वर्षांपासून मुलांचे अपहरणाच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहे. त्यापैकी काहीजणांना शोधण्यात पोलिसांना यश आहे. तर, काहीजण अद्यापही बेपत्ता असल्याचे समजत आहेत. अपहरण करणाऱ्या टोळींमध्ये महिलांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. यातच अंबरनाथ येथील घटनेने पालकांच्या चिंतेत आणखी भर घातली आहे.