Khanapur Atpadi Assembly Constituency: गोपीचंद पडळकर यांच्या दाव्यामुळे अनिल बाबर यांची उमेदवारी धोक्यात! एकनाथ शिंदे गटाला धक्का?

'खानापूर-आटपाडी मतदारसंघातून (Khanapur Atpadi Assembly Constituency) निवडणूक लढवणार नाहीत' असा गौप्यस्फोट आमदार पडळकर यांनी केला आहे. त्यावर अनिल बाबर (Anil Babar) यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया पुढे आली नाही. त्यामुळे खानापूर आटपाडीच्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधान आले आहे.

Anil Babar vs Gopichand Padalkar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे जरी मुख्यमंत्री असले तरी त्यांची खुर्ची संपूर्णपणे भाजपच्या (BJP) पाठबळावरच आधारीत आहे. त्यामुळे जोपर्यंत भाजपच्या मनात आहे तोपर्यंत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर राहतील. तसेच, एकनाथ शिंदे यांना भाजपचा दबाव झेलतच कारभार करावा लागणार असल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे. दरम्यान, आता केवळ एकनाथ शिंदेच नव्हे तर चक्क संपूर्ण शिंदे गटच भाजपच्या दबावाला बळी बडणार की काय अशी चर्चा आहे. भाजपचे विधानपरिषदेवीरल आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केलेल्या एका विधानामुळे ही चर्चा अधिक वेग पकडत आहे. 'खानापूर-आटपाडी मतदारसंघातून (Khanapur Atpadi Assembly Constituency) निवडणूक लढवणार नाहीत' असा गौप्यस्फोट आमदार पडळकर यांनी केला आहे. त्यावर अनिल बाबर (Anil Babar) यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया पुढे आली नाही. त्यामुळे खानापूर आटपाडीच्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधान आले आहे.

देशमुख गटासमोर अस्तित्वाची लढाई

खानापूर-आटपाडी (Khanapur Atpadi Assembly Constituency) मतदारसंघ हा अनिल बाबर यांचा बालेकिल्ला मानला जातो. पाठिमागील अनेक निवडणुकांमध्ये अनिल बाबर यांनी विजय मिळवत हे वारंवार सिद्ध करुन दाखवले आहे. उल्लेखनीय असे की, बाबर यांनी कधी अपक्ष, कधी काँग्रेस, कधी राष्ट्रवादी आणि आता शिवसेना अशा विविध पक्षांतून निवडणुका लढवल्या तरी अपवाद वगळता बाबर यांचा पराभव झाला नाही. शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आल्यावर आता ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहेत. महत्त्वाचे असे की,  माजी आमदार अॅड. सदाशिव पाटील यांचा गट वगळता बाबर यांना तुल्यबळ गट या मतदारसंघात पाहायला मिळत नाही. त्यामुळे अद्याप तरी मतदारसंघात बाबर गटाचेच पारडे जड मानले जाते. नाही म्हणायला माजी आमदार राजेंद्र देशमुख यांचा गट आहे. मात्र, अलिकडे त्यांनी भाजप प्रवेश केल्याने आणि गोपीचंद पडळकर यांना विधानपरिषदेवर संधी मिळाल्याने देशमुख गटासमोर अस्तित्वाची लढाई सुरु आहे. (हेही वाचा, बारामती: गोपीचंद पडळकर यांच्या पराभवाची प्रमुख कारणे)

पडळकर बांधतायत स्वत:चा गट

गोपीचंद पडळकर हे तरुण आहेत. राजकारणात त्यांनी नव्याने गटबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. काही प्रमाणात त्यांना यशही आले आहे. त्यांचे बंधु ब्रह्मानंद पडळकर हे जिल्हा परिषदेवर सदस्य आहेत. त्यांच्या मातोश्री पडळकरवाडी ग्रामपंचायत सरपंच पदी नवडून आल्या. झरे ग्रामपंचायत निवडणुकीतही पडळकर यांचे पॅनल विजयी झाले. त्यामुळे पडळकर हे आपला राजकीय गट बांधण्यात यशस्वी होत असल्याचे चित्र प्रथमदर्शनी दिसते.

बाबर पितापुत्रांचा शब्द आणि पडळकरांचा दावा

आमदार गोपीचंद पडळकर नेहमीच आपल्या वक्तव्यामुळे चर्तेत असतात. पडळकर यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत अनिल बाबर आणि त्यांचे पूत्र अमोल बाबर हे आपल्याला बारामतीच्या क्लब हाऊसमध्ये पहाटे भेटले. त्या वेळी मी बारामतीतून निवडणूक लढवत होतो. बाबर पितापुत्रांनी सांगितले की, ही आपली शेवटची टर्म आहे. 2024 च्या निवडणुकीत आम्ही आपल्या पाठीशी उभे राहू. आता आपल्याला मदत करा. त्यानुसार आम्ही त्याच वेळी शब्द पाळला. आता शब्द पाळायची वेळ त्यांची आहे. ते (बाबर) 2024 ची विधानसभा निवडणूक लढवणार नाहीत, असे पडळकर यांनी म्हटले.

प्रश्न केवळ अनिल बाबर यांचा नाही

गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यामुळे भाजप विरुद्ध शिंदे गट असा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रश्न केवळ आमदार अनिल बाबर यांचा नाही. या वक्तव्यामुळे प्रश्न शिंदे गटासमोरही आहे. विधानसभा निवडणूक 2024 मध्ये जर एकनाथ शिंदे गट आणि भाजप सोबत लढले तर शिंदे गटातील विद्यमान आमदारांच्या विरोधात भाजपला उमेदवार देणार का? अथवा जागांची आदलाबदल करत विद्यमान आमदारांचा पत्ता (शिंदे गटातील) कापून त्या ठिकाणी भाजपला उमेदवारी देणार. काही ठिकाणी भाजप उमेदवारांमध्ये फेरबदल करत शिंदे गटाचे उमेदवार उभे राहणार असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. त्यामुळे गोपीचंद पडळकर यांचे विधान केवळ खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघापूरते मर्यात असणार नाही. तर त्याला भविष्यातील भाजप विरुद्ध शिंदे गट अशा संघर्षाचीही किनार आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now