Sadabhavu Khot On Ketaki Chitale: सदाभाऊ खोतकडून केतकी चितळेच समर्थन, मला तिचा अभिमानच वाटतो
सदाभाऊ खोत म्हणाले केतकी चितळेचा मला अभिमान असल्याचे सांगत सदाभाऊ खोत यांनी केतकीचे समर्थन केले आहे सदाभाऊ खोत हे आज उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथे आले होते.
केतकी चितळे (Ketaki Chitale) हिने शुक्रवारी फेसबुकवर (Facebook) शेअर केलेल्या कवितेवरुन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharadh Pawar) यांच्यावर टीका केली आहे. या टीकेनंतर राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून (NCP) केतकी चितळे विरोधात चांगलाच जोर पाहायला मिळाला. केतकी चितळेला 18 तारखेपर्यत न्यायलयीन कोठडी सुनावली आहे. तसेच केतकी चितळे हिच्या वादग्रस्त विधानानंतर आमदार सदाभाऊ खोत (Sadabhavu Khot) यांनी केतकीचे समर्थन केले आहे. सदाभाऊ खोत म्हणाले केतकी चितळेचा मला अभिमान असल्याचे सांगत सदाभाऊ खोत यांनी केतकीचे समर्थन केले आहे सदाभाऊ खोत हे आज उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथे आले होते.
सदाभाऊ खोत म्हणाले, केतकी चितळे यांनी शरद पवार यांच्या वर वादग्रस्त पोस्ट केली होती. तिचे समर्थन करत केतकी कणखर आहे. तिला समर्थन करायला कुणाची गरज नाही, तिला मानावे लागेल. तसेच केतकी चितळेच्या विधानाचे नाही तर तिने न्यायालयात कोणत्याही वकिलाची मदत न घेता स्वतः आपली बाजू मांडल्याचे आपणांस कौतुक वाटले आणि तिचा अभिमानही वाटला, असा दावा केला.
(The above story first appeared on LatestLY on May 16, 2022 06:09 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

