Leprosy: कल्याण-डोंबिवली शहरांमध्ये कुष्ठरोग रुग्णांच्या संख्येत वाढ, नव्याने 16 जण सापडल्याने चिंता
या दिनानिमित्त विविध संस्था, संस्थेचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते कुष्टरोग्यांच्या वसाहतींना भेट देतात. कुष्ठरोग निर्मूलन आणि संपूर्ण उच्चाटनासाठी देशभर विविध कार्यक्रम स्थानिक ते राष्ट्रीय पातळीवर राबवले जातात.
राज्यातील कुष्टरोग (Leprosy) बाधितांची संख्या गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर कमी झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र आता ही संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे येत आहे. कल्याण डोंबिवला महापालिका (KDMC) आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी शहरातील कुष्ठरुग्ण असलेल्या परीसराला नुकतीच भेट दिली. यावेळी कल्याण डोंबिवली (Kalyan - Dombivali) शहरात आणखी नवे 16 कुष्ठरोग रुग्ण ( Leprosy Patients) सापडल्याचे पुढे आले. या घटनेनंतर आयुक्तांनी चिंता व्यक्त करत आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचा सूचना प्रशासनाला दिल्या.
प्राप्त माहितीनुसार, कल्याण डोंबिवली शहरात एकूण 135 कुष्ठरुग्ण आहेत. त्यापैकी 10 जणांना या आजारामुळे शारीरिक विकृती आली आहे. तर यात आणखी नव्या 16 कुष्टरोग्यांची भर पडली आहे. कल्याण कसोरे भागातील हनुमाननगर परिसरात कुष्टरोग्यांची वसाहत आहे. याच वसाहतीला केडीएमसी आयुक्तांनी भेट दिली. या वेळी येथी परिसरात बदल घडविण्यासाठी इथे इमारतींचे बांधका, रस्ते, पाणी, वीज या गोष्टी अधिक प्रभावीपणे उपलब्ध करुन देण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या. (हेही वाचा, Leprosy: अमरावती जिल्ह्यात कुष्ठरोग ठरतोय आव्हान? रुग्ण शोधमोहिमेत महत्त्वपूर्ण आकडेवारी)
30 जानेवारी हा जागतिक कुष्टरोग निर्मूलन दिवस म्हणून देशभरात साजरा केला जातो. या दिनानिमित्त विविध संस्था, संस्थेचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते कुष्टरोग्यांच्या वसाहतींना भेट देतात. कुष्ठरोग निर्मूलन आणि संपूर्ण उच्चाटनासाठी देशभर विविध कार्यक्रम स्थानिक ते राष्ट्रीय पातळीवर राबवले जातात.
दरम्यान, अमरावती जिल्ह्यातही कुष्ठरुग्ण सापडल्याचे डिसेंबर 2020 मध्ये पुढे आले होते. अमरावती (Amravati District) जिल्ह्यातील धामनगाव तालुका आरोग्य विभागाने रुग्ण शोधमोहीम राबवली होती. या मोहिमेत नागरिकांची घरोघरी जाऊन आरोग्य पथकाकडून तपासणी करण्यात आली. या तपासणीत तालुक्यात एकूण 1 लाख 5 हजार 603 नागरिकांची तपासणी केली. यात 415 संशयित क्षयरुग्ण, तर 383 संशयित कुष्ठरुग्ण, तर आढळून आले होते. या तपासणीसाठी साधारण 119 पथके नेमण्यात आली होती.