KCR in Maharashtra: तेलंगणाचे मुख्यमंत्री K. Chandrashekar Rao 600 वाहनांच्या ताफ्यासह सोलापूरच्या दिशेने; मंत्रिमंडळासह उद्या घेणार विठ्ठल -रूक्मिणीचं दर्शन

2024 मध्ये होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी बीआरएसने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्या दृष्टीने ही भेट महत्त्वाची आहे.

KCR | Twitter

तेलंगणाचे मुख्यमंत्री K. Chandrashekar Rao आज (26 जून) 600 वाहनांच्या ताफ्यासह सोलापूरात दाखल झाले आहेत. केसीआर  मंत्रिमंडळासह उद्या (27 जून) विठ्ठल -रूक्मिणीचं दर्शन  घेणार आहेत. केसीआर यांच्या स्वागताला कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. फुलांच्या पाकळ्या उधळत त्यांचं सोलापूरामध्ये स्वागत झालं आहे. हैदराबाद ते सोलापूर प्रवास करत आज महाराष्ट्रात दाखल झालेल्या केसीआर यांच्यासोबत आमदार, खासदार आणि अन्य कार्यकर्ते आहेत. दरम्यान आषाढी एकादशीचं औचित्य साधत केसीआर पंढरपूरामध्ये वारकर्‍यांच्या सोबतीने विठू माऊलीचं दर्शन घेणार आहेत. मात्र त्यांच्या या दौर्‍यावरून हिंदू राष्ट्र सेनेने आपला निषेध दर्शवला आहे.

केसीआर 300-400 जणांसोबत दर्शनाला गेल्यास या व्हीआयपी दर्शनाने वारकरी ताटकळत राहू शकतात. यावरून  हिंदू राष्ट्र सेनेने आपलं एक निवेदनही दिलं आहे. दरम्यान केसीआर यांना दर्शनाच्या वेळेस मंदिरावर पुष्पवृष्टी करायची होती त्याला मात्र प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव परवानगी नाकारली आहे. आता आमदार, खासदारांसह उद्या केसीआर विठू चरणी लीन होणार आहेत. सध्या पालख्या देखील पंढरपूरामध्ये दाखल होत आहेत. NCP Leader Ghar Wapsi From BRS: KCR यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांवर डल्ला, अनिल देशमुख यांच्यामुळे तीन दिवसांत 'घरवापसी' .

पहा केसीआर यांचे  स्वागत  

केसीआर दोन दिवसीय महाराष्ट्र दौर्‍यावर आहेत. पंढरपूर नंतर ते तुळजापूरला देखील दर्शनाला जाणार आहेत. “मेरा वोट मेरी सरकार अबकी बार किसान सरकार” चा नारा देत केसीआर महाराष्ट्रातील राजकारणामध्ये प्रवेश करू पाहत आहेत. ऑक्टोबर 2024 मध्ये होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी बीआरएसने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महाराष्ट्र विधानसभेचे काही माजी आमदार आणि खासदार यापूर्वीच बीआरएसमध्ये सामील झाले आहेत. बीआरएसला हलक्यात घेऊ नका, असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी केले आहे.

पंढरपुरात सरकोली येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते, माजी आमदार भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांच्या सरकोली गावात केसीआर व त्यांचे सहकारी शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत. याचवेळी भगीरथ भालके हे आपल्या सहकाऱ्यांसह बीआरएस पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत.

 

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now