Kashif Khan on Drugs Case: ड्रग्स सोबत माझा कोणताही संबंध नाही, नबाव मलिक यांच्या आरोपांवर काशिफ खान याची प्रतिक्रिया

त्यानंतर आज अखेर मलिक यांनी त्याचे नाव काशिद खान असल्याचा खुलासा केला. काशिफ खान हा फॅशन टीव्हीचा एमडी मॅनेजिंग डायरेक्टर आहे.

Kashif Khan (Photo Credits-Twitter)

Kashif Khan on Drugs Case: मुंबईतील क्रुज पार्टी ड्रग्ज प्रकरणी महाराष्ट्र मंत्री नवाब मलिक यांनी सातत्याने एका दाढीवाल्या व्यक्तीचा उल्लेख केला. त्यानंतर आज अखेर मलिक यांनी त्याचे नाव काशिद खान असल्याचा खुलासा केला. काशिफ खान हा फॅशन टीव्हीचा एमडी मॅनेजिंग डायरेक्टर आहे. पहिल्यांदा काशिद खान याने एबीपी सोबत केलेल्या एक्सक्लूसिव बातचीत मध्ये असे म्हटले की, मी या सर्व आरोपांचे खंडन करतो. तर नवाब मलिक यांनी दिलेली माहिती चुकीची असून लावण्यात आलेले आरोप ही खोटे आहेत.(Drugs Case: क्रुजवरील दाढीवाला काशिफ खान असल्याचा खुलासा, नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केले 'हे' गंभीर आरोप)

काशिफ खान याने पुढे असे म्हटले की, क्रुजवर हत्यारे घेऊन जाण्याची बाब चुकीची आहे. मला कळत नाही नवाब मलिक असे का करत आहेत. माझ्यावर लावण्यात आलेले आरोप हे पूर्णपणे खोटे आहेत. ड्रग्ज सोबत माझे काही घेणेदेणे नाही. मी सिगरेट सुद्धा ओढत नाही. मी कोणत्याही पार्टीचे आयोजन सुद्धा केले नव्हते. क्रुजवरील पार्टी ही दिल्लीतील एका इवेंट कंपनीने आयोजित केली होती.(Samir Wankhede on Nawab Malik: काशिफ खान याच्या अटकेवरुन नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपावर समीर वानखेडे यांनी मीडियाला दिली प्रतिक्रिया)

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मंत्री नवाब मलिक यांनी शुक्रवारी फॅशन टीव्ही इंडियाचे प्रमुख काशिफ खान याच्या अटकेची मागणी केली. खान हा तोच दाढीवाला व्यक्ती आहे ज्याची ओळख मलिक यांनी क्रुज पार्टीचा चीफ ऑर्गेनाइजरच्या रुपात केली होती. त्याचसोबत मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर ही हल्लाबोल केला. त्यांनी असे म्हटले की, वानखेडे आणि काशिद खान यांच्यात उत्तम संबंध आहेत.



संबंधित बातम्या

Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख हत्येप्रकरणातील आरोपींची मालमत्ता जप्त करण्यात येणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

Kalyan Girl Rape-Murder Case: कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन हत्या; ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम न्यायालयात बाजू मांडणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

Australia vs India 4th Test Day 4 Preview: टीम इंडिया चौथ्या दिवशी सामन्यात पुनरागमन करणार की ऑस्ट्रेलीयन गोलंदाज मोठा पलटवार करणार? खेळपट्टी अहवाल, मिनी लढाई आणि लाइव्ह स्ट्रीमिंगसह सर्व माहिती जाणून घ्या

Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख हत्येची चौकशी होईपर्यंत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या; बीड मूक मोर्चा आंदोलकांची मागणी