Kasba Assembly Election Result 2023: भाजपचा कसबा गेला? हेमंत रासने पिछाडीवर, रविंद्र धंगेरकर यांची जोरदार मुसंडी
पण या बालेकिल्ल्याला सुरुंग लागतो की काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे. कसबा पोटनिवडणुकीत (Kasba, Chinchwad Assembly Election Result 2023) झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरु असून प्राथमिक कल हाती येण्यास सुरवात झाली आहे. प्राथमिक कलानुसार चौथ्या फेरी अखेर महाविकासआघाडीच्या वतीने रिंगणात असलेले रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangeka) आघाडीवर आहेत.
कसबा म्हणजे भाजपचा बालेकिल्ला. पण या बालेकिल्ल्याला सुरुंग लागतो की काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे. कसबा पोटनिवडणुकीत (Kasba, Chinchwad Assembly Election Result 2023) झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरु असून प्राथमिक कल हाती येण्यास सुरवात झाली आहे. प्राथमिक कलानुसार 11 व्या फेरीअखेर महाविकासआघाडीच्या वतीने रिंगणात असलेले रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangeka) 4,612 मतांनी आघाडीवर आहेत. तर भाजपचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasane) पिछाडीवर दिसत आहेत. त्यामुळे भाजपचा कसबा गेला की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. अर्थात मतमोजणी अद्यापही बाकी आहे. दोन्ही उमेदवारांमध्ये काट्याची टक्कर आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळातील चर्चांना तसा विशेष अर्थ नाही.
दरम्यान, हेमंत रासने विरुद्ध रविद्र धंगेकर हा सामना अत्यंत चुरशीचा आणि तितकाच रंजक होताना पाहायला मिळतो आहे. हा सामना केवळ 5000 ते 7000 इतक्या मतांच्या फरकाने सुटेल असा अभ्यासकांचा दावा आहे. हेमंत रासने हे भाजपकडून मैदानात आहेत. या ठिकाणी दिवंगत मुक्ता टिळक या देखील भाजपच्याच आमदार होत्या. त्यामुळे विद्यमान आमदाराच्या जागेवर हेमंत रासने रिंगणात आहेत. त्यामुळे मतदारांची सहानुभुती रासने यांना मिळेल असा कयास व्यक्त केला गेला आहे. (हेही वाचा, Kasba, Chinchwad Assembly Election Result 2023: कसबा, चिंचवड विधानसभा निवडणूक मतमोजणीस सुरुवात)
मतमोजणीची 11 वी फेरी कसबा येथील विद्यमान स्थिती काय?
रविंद्र धंगेकर- 45,504 मते (4,612 मतांनी आघाडी)
हेमंत रासने- 40,892 मते
दुसऱ्या बाजूला रविंद्र धंगेकर हे महाविकासआघाडीकडून रिंगणात आहेत. ते काँग्रेसचे उमेदवार असले तरी राष्ट्रवादी आणि शिवसेना तसेच मविआच्या इतरही घटक पक्षांनी या ठिकाणी मन लावून प्रचार केला. परिणामी काँग्रेसचे मूळ मतदार आणि महाविकासआघाडीमुळे जोडले गेलेले मतदार असा दुहेरी फायदा रविंद्र धंगेकर यांना मिळू शकतो असले मानले जात आहे. सर्व तपशीलासह निकाल लवकरच आपल्या भेटीला येणारआ आहे.
सकाळी आठ वाजले पासून कसबा पोटनिवडणुकीसाठी मतमोजणीस सुरुवात झाली. एकूण 20 फेऱ्यांमध्ये मतदान पार पडणार आहे. मतमोजणीसाठी जवळपास 50 अधिकारी प्रत्येक टेबलवर तैनात आहेत. ईव्हीएम मतमोजणीसाठी 14 टेबल तर टपाली मतपत्रिकांसाठी आणि सर्व्हिस वोटर्ससाठीच्या इटीपीबीएससाठी (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीम) प्रत्येकी एक टेबल दजेण्यात आला आहे. अत्यंत काटोकोर पद्धीने मतमोजणी सुरु आहे.