Kasba Assembly Election Result 2023: बालेकिल्ल्यात भाजप चारीमुंड्या चीत; रविंद्र धंगेकर विजयी, भाजपचे हेमंत रासने पराभूत, CM एकनाथ शिंदे, डीसीएम देवेंद्र फडणवीस यांना धक्का
कसबा विधानसभा निवडणुकीत (Kasba Assembly Election Result 2023) महाविकासआघाडीच्या (MVA) रुपात उभे असलेले काँग्रेस उमदेवार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांचा दणदणीत विजय झाला आहे. रविंद्र धंगेकर यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasane) यांचा मोठा पराभव झाला आहे.
कसबा विधानसभा निवडणुकीत (Kasba Assembly Election Result 2023) महाविकासआघाडीच्या (MVA) रुपात उभे असलेले काँग्रेस उमदेवार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांचा दणदणीत विजय झाला आहे. रविंद्र धंगेकर यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasane) यांचा मोठा पराभव झाला आहे. हेमंत रासणे यांचा पराभव होणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणीस (Devendra Fadnavis) यांना मोठा धक्का मानला जात आहे. कारण, कसबा हा भाजपचा बालेकिल्ला समजला जात असे. पाठिमागील अनेक वर्षे गिरीष बापट आणि मुक्ता टिळक या मतदारसंघातून विजयी होत आले आहेत. कट्टर भाजपचा मतदारसंघ म्हणून ओळखला जाणाऱ्या कसब्यात पारडे फिरलेच कसे याबातब भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) समर्थकांमध्ये चर्चा सुरु आहे.
कसबा विधानसभा मतदारसंघासाठी एकूण 20 फेऱ्यांमध्ये मतमोजणी पार पडली. या मतमोजणीचे वैशिष्ट्य असे की, एखादा अपवाद वगळता कोणत्याच फेरीत भाजप उमेदवार असलेल्या हेमंत रासने यांना आघाडी घेता आली नाही. पोस्टल बॅलेट मतमोजणीपासून मविआच्या रविंद्र धंगेकरांनी जी आघाडी घेतली होती ती जवळपास सर्व फेऱ्यांमध्ये कायम ठेवली. त्यामुळे पहिल्या फेरीपासुन सुरु असलेली रविंद्र धंगेकर यांची घोडदौड जवळपास 10 व्या अधिकच वेगवान झाली. परिणामी 20 व्या फेरीअखेर धंगेकरांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. (हेही वाचा, Kasba Peth Assembly By-Election: महाविकास आघाडीच्या Ravindra Dhangekar यांनी मारलं कसब्याचं मैदान; 11400 मतांच्या फरकाने विजय)
रविंद्र धंगेकर यांना एकूण 72,599 मते मिळाली तर त्यांचे दुसऱ्या क्रमांकाचे प्रतिस्पर्धी भाजप उमेदवार हेमंत रासने यांना 61,771 मते मिळाली. म्हणजेच रविंद्र धंगेकर यांनी रासने यांच्यावर 10,828 मतांनी आघाडी घेतली. जी निर्णायक ठरली.
दरम्यान, कसबापेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधक असे सर्वच जोरदार कामाला लागले होते. सत्ताधारी गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले होते. शिवाय एकनाथ शिंदे गटाचे जवळपास सर्वच आमदार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि इतर मंत्रीही प्रचारासाठी रिंगणात होते. महाविकासआघाडीकडून उद्धव ठाकरे (ऑनलाईन), अजित पवार, आदित्य ठाकरे, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, सुनील केदार यांच्यासह सर्व नेते मैदानात होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार हे सुद्धा शेवटच्याक्षणी मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)