Reasons for BJP's defeat in Kasba: बालेकिल्ला कसबा येथील भाजप पराभवाची प्रमुख कारणे; देवेंद्र फडणवीस सुद्धा जबाबदार
कसब्यातील पराभवानंतर राज्याचे उमुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यातील प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी आत्मपरीक्षण करणार असल्याचे म्हटले आहे. भाजपचे आत्मपरीक्षण होईल तेव्हा होईल. पण मतदार आणि स्थानिक नागरिकांची प्रतिक्रिया घेतली तर ते त्यांनी या पराभवाचे लगेचच विश्लेशन केले आहे.
Reasons for BJP's defeat in Kasba: कसबा विधानसभा (Kasba Assembly By-Election 2012) पोटनिवडणुकीत भारतीय जतना पक्षाचा (BJP) दणदणीत पराभव झाला. ज्यामुळे भाजपच्या आक्रमक नेत्यांचा सूर भलताच नरम झाला. महाविकासआघाडीच्या रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्याकडून भाजपच्या हेमंत रासने (Hemant Rasane) यांचा पराभव झाला. या पराभवाचे आता विविध पातळ्यांवर विश्लेषन केले जात आहे. राज्याचे उमुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यातील प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी आत्मपरीक्षण करणार असल्याचे म्हटले आहे. भाजपचे आत्मपरीक्षण होईल तेव्हा होईल. पण मतदार आणि स्थानिक नागरिकांची प्रतिक्रिया घेतली तर ते त्यांनी या पराभवाचे लगेचच विश्लेशन केले आहे.
देवेंद्र फडणीस यांचे वक्तव्य
कसबा हा सुरुवातीपासूनच विविध जातीधर्माच्या लोकांनी वसलेला मतदारसंघ राहिला आहे. त्यामुळे सहाजिकच कसब्यामध्ये मुस्लिम मतदारही मोठ्या प्रमाणावर आहे. सांगितले जाते की, इतर ठिकाणी राज्यात काहीझाले तरी कसब्याती मतदार हा गिरीश बापट यांच्या पाठिमागे ठामपणे उभा राहायचा. गिरीश बापटही भाजप नेते असले तरी त्यांच्या कसबा मतदारसंघात ते पक्षाचा हिंदुतत्ववाद फारसा आणत नसत. पण, देवेंद्र फडणवीस यांनी शेवटच्या काही दिवसांमध्ये प्रचारात कसबा हा हिंदुत्त्ववाद्यांचा आहे असे विधान केले. ज्यामुळे भाजपच्या मतांमध्ये जोरदार फूट पडली.
चुकीचा उमेदवार
भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली. जे आगोदर पुणे महापालिकेत नगरसेवक आणि स्थाई समिती अध्यक्ष पदावरही होते. या पदावर असताना भाजपमधीलच अनेक पदाधिकाऱ्यांनी थेट नाराजी बोलून दाखवली होती. त्यामुळे रासने यांच्या विरोधात सुरुवातीपासूनच नाराजी होती. जी त्यांना निवडणुकीच्या रिंगणातही महागात पडली. (हेही वाचा, Aaditya Thackeray, Ajit Pawar: आदित्य ठाकरे, अजित पवार यांच्यामुळे मविआला गवसली विजयाची किल्ली? कसब्यात काँग्रेस उमेदवार Ravindra Dhangerkar यांचा विजय)
काँग्रेस आणि महाविकासआघाडीकडून तगडा उमेदवार
महाविकासआघाडीने काँग्रेसच्या वतीने रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली. रविंद्र धंगेकर हा अत्यंत सर्वसामान्य चेहरा म्हणून पुणे आणि खास करुन कसब्यात परिचीत आहे. अशा वेळी सर्वसामान्य उमेदवारांची रविंद्र धंगेरकर यांना जोरदार सहानुभुती मिळाली. ज्याचा परिणाम भाजपच्या कमकुवत उमेदवाराच्या पराभवात झाला.
गिरीश बापटांना प्रचारात उतरवणे
कसबा मतदारसंघातून अनेक वर्षे प्रतिनिधित्व केलेल्या खासदार गिरीश बापट हे सध्या प्रचंड आजारी आहेत. त्यांच्या नाकातोंडात सळ्या आहेत. असे असतानाही भाजपने त्यांना प्रकृती अत्यंत प्रतिकूल असतानाही निवडणूक प्रचारात उतरवले. त्यामुळे भाजप आपल्या नेत्यांना केवळ एक उत्पादन म्हणून पाहते असे चित्र निर्माण झाले. त्यामुळे थेट भाजपशी संबंधित नसलेले पण गिरीश बापट यांच्याशी भावनिक नाते असलेले त्यांचे कट्टर समर्थक चिडले. त्यांनी थेट आपले मत रविंद्र धंगेकरांच्या पारड्यात टाकले.
पैसे आणि दादागिरीचा आरोप
भाजपकडून या निवडणुकीत पैशांचा पुरेपूर वापर करत असल्याचा आरोप झाला. हा आरोप इतका गंभीर होता की, थेट पोलिसांच्या वाहनांतून पैसे वाटल्याचा आरोप झाला. पैसे वाटत असल्याचे अनेक व्हिडिओही पुढे आले. काही ठिकाणी थेट महिला आणि मतदारांना मारहाण झाल्याच्या तक्रारी, आरोपही झाले. ज्यामुळे भाजपची प्रतिमा अत्यंत मलीन झाली. या सर्वांचा परिणाम भाजपच्या पराभवात झाला.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)