Karnataka: महाराष्ट्र-कर्नाटक वाद पेटला; कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावातील मराठी भाषेतील फलक काढले
कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी (Karnataka Rakshana Vedike) बेळगावमधील (Belagavi) मराठी भाषेतील फलक काढून टाकल्याची माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक वाद पुन्हा चिघळला आहे. कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी (Karnataka Rakshana Vedike) बेळगावमधील (Belagavi) मराठी भाषेतील फलक काढून टाकल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात एएनआयने वृत्त दिले आहे. रामलिंगखिंड गल्ली येथे शिवसेनेचे कार्यालय आहे. शिवसेना प्रकाश शिरोळकर यांच्या गाडीवर शुक्रवारी कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्यांनी हल्ला केला होता. तसेच प्रकाश शिरोळकर यांच्या गाडीवरच्या फलकाला कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काळ फासण्याचा प्रयत्न केला होता.
शिरोळकर यांनी या कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर दिले. पंधरा ते वीस जण हे कृत्य करत असताना पोलिसांनी मात्र बघ्याची भूमिका घेतली. यामुळे सीमाभागातील मराठी बांधवांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, याला प्रत्युत्तर देत कोल्हापुरात शिवसेनेने कर्नाटकच्या बसेसना बंदी घातल्याची माहिती समोर येत आहे. हे देखील वाचा- Ambani House Bomb Scare: API सचिन वाझे यांना ठाणे सेशन कोर्टाने अंतरिम जामीन फेटाळला
एएनआयचे ट्वीट-
याप्रकरणावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पश्चिम बंगालमधील हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बेळगावमध्ये सुरू असलेल्या खुनी हल्ल्यांवर गप्प का?, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. तसेच बेळगावात कानडींकडून मराठी माणसांवर खुनी हल्ले सुरू असून त्या परिस्थितीला केंद्र सरकारच जबाबदार आहे, असेही संजय राऊत म्हणाले आहेत.