Karnataka Rajyotsava 2020: बेळगावसह सीमाभागात आज मराठी बांधवांकडून काळा दिन; महाराष्ट्रात मंत्री जयंत पाटील, बच्चू कडू यांच्याकडून हातावर काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त

महाराष्ट्रात मराठी भाषिकांच्या पाठिशी उभं राहत महाविकास आघाडीमधील मंत्र्यांनी हाताला काळ्या फिती बांधून कामकाज सुरू करत आपला निषेध नोंदवला आहे.

Karnataka | Photo Credits: Twitter

भारतामध्ये आज (1 नोव्हेंबर) केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा आणि छत्तीसगड मध्ये राज्य निमितीचा दिवस साजरा केला जातो. पण महाराष्ट्र आणि कर्नाटक भागात बेळगाव (Belgaum) सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ही सीमावासियांची भावना आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही आपली ही मागणी रेटण्यासाठी मराठी बांधवांनी काळा दिन पाळला आहे. कर्नाटकात या आंदोलनाला दडपण्याचे प्रयत्न सुरू आहे. तर महाराष्ट्रात मराठी भाषिकांच्या पाठिशी उभं राहत महाविकास आघाडीमधील मंत्र्यांनी हाताला काळ्या फिती बांधून कामकाज सुरू करत आपला निषेध नोंदवला आहे.

“आमचा मराठी माणसाचा सीमाभाग लवकरच महाराष्ट्रात सामील होईल”, अशी खात्री असल्याची भावना राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मांडली आहे. कर्नाटकरात मराठी बांधवांवर होणारा अन्याय, अत्याचाराचा निषेध मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात येत आहे असे त्यांनी सांगितले आहे. सीमाभागातील नागरिकांना पाठिंबा दर्शवण्यासाठी महाविकास आघाडी सरकारचे संपूर्ण मंत्रिमंडळ आज काळ्या फिती बांधत कामकाज करत आहेत असे म्हणत बच्चू कडू यांनी देखील निषेध व्यक्त केला आहे.

जयंत पाटील

बच्चू कडू

सतेज पाटील

दरम्यान कर्नाटकामध्ये आज कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनीही मराठी भाषिकांच्या कार्यक्रमामध्ये धुडगुस घातला आहे. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी सूर्य-चंद्र असेपर्यंत बेळगाव कर्नाटकातच असेल असं वक्तव्य केले आहे. त्याचा देखील मराठी भाषकांनी निषेध नोंदवला आहे. महाराष्ट्रातून सवदी यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला आहे. शिवसेना नेते संजय राऊत आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सवदींना प्रत्युत्तर देत त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif