महाराष्ट्र-कर्नाटक राज्यांमध्ये पाणी वाटपावरुन करार होणार

महाराष्ट्र सरकारसोबत पाणी वाटपावरुन करार करण्यासाठी कर्नाटक (Karnataka) सरकार तयार झाले आहे.

Dam | Image used for representational purpose | (Photo Credits: ANI Twitter)

महाराष्ट्र सरकारसोबत पाणी वाटपावरुन करार करण्यासाठी कर्नाटक (Karnataka) सरकार तयार झाले आहे. याबद्दल अधिक माहिती कर्नाटक जलसंपदा मंत्री डी.के. शिवकुमार यांनी दिली आहे. तर कृष्णा नदी काठालगत असणाऱ्या गावांना ऐन उन्हाळ्यात पाण्याची समस्या उद्भवते. त्यामुळे ही समस्या कायमस्वरुपी सोडवण्यासाठी आता कर्नाटकने सुद्धा हिरवा कंदीला दाखवला आहे.

कर्नाटक जल निगमच्या कार्यालयात बेळगाव, बागलकोट आणि विजापूर येथील आमदार, खासदारांची बैठक पार पडली. त्यावेळी महाराष्ट्रातून कृष्णा नदीचे पाणी सोडण्याबद्दल चर्चा करण्यात आली. दरवर्षी कृष्णा नदीचे पाणी चार टीएमसी ऐवढे सोडण्यात येते. तर 2004 ते 2017 पर्यंत कर्नाटकाने महाराष्ट्रातून पाणी विकत घेतले आहे. त्यामुळे परस्पर पाणी वाटप करारावरुन पाणी समस्या सोडवण्यासाठी हा करार करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.(Coastal Road: कोस्टल रोड कामावरील स्थगिती उठवली; Supreme Court निर्णयामुळे मुंबई महापालिकेला दिलासा)

तर पाणी करार कसा असावा याबद्दल तांत्रित समिती स्थापन करण्यात येणार आहे. त्याचसोबत चार टीएमसी पाणी कर्नाकटकडून अलमट्टी धरणातून सोलापूर आणि जतसाठी प्रत्येक वर्षाला सोडावे अशी मागणी महाराष्ट्राकडून करण्यात आली आहे.