Kareena Kapoor Spotted After Saif Ali Khan Stabbing: सैफ अली खान याच्यावर चाकूहल्ला, पत्नी करीना कपूर व्यथीत; वांद्रे येथील घरचा Video Viral
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर त्याच्या वांद्रे येथील निवासस्थानी चाकूहल्ला झाला आहे. कथीतरित्या घरफोडीच्या प्रयत्नात अज्ञाताने त्याला भोसकले. करीना कपूर खान आणि तिची मुले घरी होती पण सुरक्षित आहेत.
Mumbai Crime: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan Stabbed) याच्यावर त्याच्या राहत्या घरी अज्ञाताकडून चाकूहल्ला झाला. मुंबईतील वांद्रे परिसरातील त्याच्या निवास्थानी ही घटना गुरुवारी (16 जानेवारी) पहाटे घडली. अभिनेत्याची पत्नी करीना कपूर खान (Kareena Kapoor) आणि उभयतांची दोन्ही मुले तैमूर आणि जेह घटना घडली तेव्हा घरीच होते. या घटनेनंतर त्याचे कुटुंबीय हादरुन गेले. दरम्यान, या घटनंतरच्या काही क्षणांचा कथीत व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्याच्या माध्यमातून करीना कपूर खान घरातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधतानाची दृश्ये ऑनलाइन समोर आली आहेत.
करीना तणावात?
पती सैफ अली खान याच्यावर झालेल्या चाकू हल्ल्याच्या घटनेनंतर काही तासातच करीना कपूर खान घरातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधतानाची दृश्ये ऑनलाइन समोर आली आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, करीना कर्मचाऱ्यांचे म्हणणे ऐकून त्या वेदनादायक घटनेचे वर्णन करताना तणावग्रस्त दिसत आहे. पांढरा पायघोळ पायजमा आणि चप्पल घातलेली गुलाबी टी-शर्ट परिधान केलेली करीना घरात फिरताना आणि कर्मचाऱ्यांशी बोलताना दिसते. पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास अभिनेत्यासोबत घडलेल्या या घटनेने चित्रपटसृष्टी आणि चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. (हेही वाचा, Attack On Saif Ali Khan: अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला; रात्री घरात घुसलेल्या चोरट्याने केले वार, लीलावती रुग्णालयात ऑपरेशन सुरू)
लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया
चाकूहल्ला करणाऱ्या व्यक्तीने अनेक वार केल्याने आणि घाव खोलवर लागल्याने अभिनेता सैफ अली खान गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने मुंबई येथील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार, त्याच्या खांदा, चेहरा आणि शरीरावरील इतर भागांवर जखमा झाल्याने डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येत असून तज्ज्ञ डॉक्टरांचे एक पथक त्याच्यावर नजर ठेऊन आहे.
काय आहे प्रकरण?
मुंबई पोलिसांना प्राप्त झालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मुंबई येथील वांद्र परिसरातील उच्चभ्रू सोसायटीत आलिशान घरात राहणाऱ्या अभिनेता सैफ अली खान याच्या घरात एक अज्ञात व्यक्ती रात्रीचा घुसला. हा अज्ञात व्यक्ती चोरी करण्याच्या उद्देशाने घरात घुसल्याचा प्राथमिक संशय आहे. या व्यक्तीचा आणि घरातील कर्मचाऱ्याचा वाद झाला. पहाटेच्या वेळी घडलेल्या घटनेमुळे सैफ बाहेर अला असता त्याने वादात मद्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या अज्ञात इसमाने थेट अभिनेत्याववरच हल्ला केला. या घटनेनंतर जोरदार खळबळ उडाली असून, मुंबई पोलिसांचे पथक कसून तपास करत आहे. पोलिसांनी तातडीने अभिनेत्याच्या घराला भेट दिली आणि काही कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले. त्यांचे फोनही पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. दरम्यान, अद्यापही हल्लेखोर बेपत्ता आहे. त्याची ओळकही पटू शकली नाही.
करीना कपूर हिच्या टीमकडून निवेदन
दरम्यान, अभीनेत्यावरील हल्ल्याच्या घटनेनंतर करीना कपूरच्या टीमने चाहत्यांना कुटुंबाच्या सुरक्षेचे आश्वासन देत एक निवेदन जारी केले आहे. ज्यामध्ये म्हटले आहे: 'काल रात्री सैफ अली खान आणि करीना यांच्या घरी घरफोडीचा प्रयत्न झाला. सैफच्या हाताला दुखापत झाली असून त्याच्यावर वैद्यकीय प्रक्रिया सुरू आहे. उर्वरित कुटुंब सुरक्षित आहे'.
करीना कपूरचा कर्मचाऱ्यांशी संवाद
View this post on Instagram
करीनाच्या सोशल मीडिया पोस्टवर प्रश्नचिन्ह
विशेष म्हणजे, चोरीची पुष्टी होण्यापूर्वी करीनाने करिश्मा कपूर, सोनम कपूर आणि रिया कपूरसोबत मुलींच्या रात्रीचा एक फोटो शेअर केला होता. मात्र, घटनेच्या वेळी करीना घरीच होती, असे पोलिसांनी स्पष्ट केले.
इंडस्ट्री आणि चाहत्यांची प्रतिक्रिया: हल्ल्याच्या बातमीने बॉलीवूड सेलिब्रिटी आणि चाहत्यांकडून चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे, जे सैफच्या स्थितीबद्दल अद्ययावत माहितीची वाट पाहत आहेत. दुसऱ्या बाजूला राजकीय वर्तुळातून या घटनेची गंभीर दखल घेतली गेली असून, राज्य सरकार बेजबाबदारपणे वागत आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती प्रचंड ढासळली असल्याचे विरोधकांनी म्हटले आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jan 16, 2025 12:12 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

