Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत नवी मुंबईचे कांबळे दाम्पत्य घेणार प्राणप्रतिष्ठेच्या पूजेत सहभाग!
3 जानेवारीला अयोध्येवरून राम मंदिर जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास निमंत्रणाचा फोन कांबळे कुटुंबाला आला होता.
अयोद्धेच्या राम मंदिरामध्ये (Ayodhya Ram Mandir) रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. अशामध्ये या सोहळ्यात पूजेचा मान देशातील 11 दाम्पत्यांना मिळाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातून नवी मुंबईचे कांबळे (Kambale) दांम्पत्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत (PM Narendra Modi) त्यांना देखील पूजेत सहभागी होता येणार आहे. नुकतंच त्यांना आमंत्रण मिळालं असल्याने सध्या त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही.
विठ्ठल कांबळे आणि उज्वला कांबळे असं या दाम्पत्याचे नाव आहे. राम मंदिर लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या दाम्पत्यांना 15 जानेवारीपासून काही विधींशी नियमित नियमांचे पालन करावं लागणार आहे. या दाम्पत्यांना 15 जानेवारी ते 22 जानेवारीपर्यंत कडक 45 नियमांचं पालन करावं लागणार आहे. यामध्ये वस्त्र परिधान ते जेवणापर्यंत अनेक नियमांचा सामावेश आहे. विठ्ठल कांबळे हे चेंबूर एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आहेत. रा. स्व. संघाचे स्वयंसेवक असलेले कांबळे 1992 च्या कार सेवेत सहभागी होते. First Look Of idol of Lord Ram inside Ayodhya temple: अयोद्धेच्या राम मंदिरातील रामलल्लांच्या मूर्तीची पहा पहिली झलक (See Pic) .
3 जानेवारीला अयोध्येवरून राम मंदिर जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास निमंत्रणाचा फोन कांबळे कुटुंबाला आला होता. अयोध्येच्या या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार असल्याने ते धोतर आणि त्यांची पत्नी पैठणी परिधान करणार असल्याचे कांबळे दाम्पत्याने सांगितले आहे.
'मागील 32 वर्षांत कधीही अयोध्येला गेलो नाही. रामलल्लाला तंबूत राहिलेले देखील मी पाहिले. आता तिथे भव्य मंदिर बघायला मिळेल. प्रभू रामलल्लाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना आमच्या उपस्थितीत होत आहे. हे आमचे परम भाग्य आहे.'अशी प्रतिक्रिया दिल्याचं मटाच्या वृत्तामध्ये दिलं आहे.