Kalyan Shocker: लॉजच्या खोलीत सापडला 32 वर्षीय महिलेचा मृतदेह,कल्याण शहारातील घटना; तपास सुरु
कल्याण शहरात एका लॉजमध्य्ये महिलेचा मृतदेह सापडल्याची माहिती मिळाली आहे. रविवारच्या सकाळी ही घटना उघडकीस आली आहे.
Kalyan Shocker: कल्याण (Kalyan) शहरात एका लॉजमध्य्ये महिलेचा मृतदेह सापडल्याची माहिती मिळाली आहे. रविवारच्या सकाळी ही घटना उघडकीस आली आहे. महिला शनिवारच्या दुपारी एका व्यक्तीसोबत लॉजमध्ये आली होती. त्यानंतर तो जेवण पार्सल आणण्यासाठी जात असल्याचे सांगून तिथून तो निघून गेला. तर रविवारच्या सकाळी वेटर रुम सर्व्हिससाठी गेला असता त्याला संबंधित महिलाचा मृतदेह (Deathbody) आढळून आला. या प्रकरणी वेटरने मालकाला माहिती दिली त्यानंतर मालकाने पोलिसांना फोन करून या घटने संदर्भात माहिती दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्योती तोरडमल असं मृत महिलेचे नाव आहे. ती 32 वर्षाची होती. शनिवारी दुपारी ३.३०च्या दरम्यान भूपेंद्र गिरि असं नाव असलेल्या व्यक्तीसोबत कल्याण रेल्वे स्थानकाजवळील तृप्ती लॉजमध्ये आली. काही वेळानंतर भुपेंद्र जेवण पार्सल आणण्यासाठी लॉजमधून बाहेर पडला. त्यानंतर तो परतला नाही. रविवारच्या सकाळी लॉजमध्ये वेटरने रुम सर्व्हिससाठी ज्योती यांच्या खोलीत गेला. वेटरने दरवाजा ठोठवला परंतु काहीच प्रतिसाद नसल्याने दिसून आले. परंतु वेटरला रुमचा दरवाजा लॉक नसल्याचे दिसून आले. त्यानंतर खोलीचा दरवाजा उघडत आत गेला. त्याला ज्योती मृतावस्थेत दिसली.त्याने ही घटना तात्काळ लॉजच्या मालकाला सांगितली. त्यानंतर मालकाने महात्मा फुले पोलिस ठाण्यात फोन करून घटना सांगितली.
ही घटना परिसरात कळताच मोठी खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला. तसेच ज्योतीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवला. भुपेंद्र फरार असल्याने पोलिसांना त्याच्यावर संशय आला आहे. पोलिसांनी भुपेंद्रला पकडण्यासाठी पथक नेमलं आहे. महिलेच्या तोंडावर उशी छेवून हत्या करण्यात आल्याचा संशय आला आहे.
(The above story first appeared on LatestLY on Dec 11, 2023 10:17 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

