Kalyan Crime: कल्याणमध्ये सात लाख किमतीचे एमडी ड्रग्स जप्त, चौघांना अटक
पोलिसांनी नवी मुंबई येथे सापळा या नायजेरियन ड्रग्स तस्कराला बेड ठोकल्या.
सध्या राज्यात अमली पदार्थाविरोधात पोलिसांनी जोरदार मोहीम उघडली आहे. कल्याणच्या (Kalyan) कोळशेवाडी आणि खडकपाडा पोलिसांनी ड्रग्ज रॅकेटचा मोठा भांडाफोड केला आहे. कोळशेवाडी आणि खडकपाडा पोलिसांनी एमडी ड्रग्स विरोधात मोठी कारवाई केली आहे. ड्रग्स तस्कर नायजेरियन नागरिकासह दोन आरोपीना (Police) पोलिसांनी अटक केली आहे. कल्याणजवळ आंबिवली इराणी वस्तीमधून एका महिला ड्रग्स तस्करला देखील अटक केली आहे. (हेही वाचा - Marathwada Farmers Suicide: मराठवाड्यात शेतकरी संकटात, कृषीमंत्र्यांच्या बीडमध्ये सर्वाधिक आत्महत्या)
एसीपी कल्याण घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण कोळशेवाडी पोलीस व खडकपाडा पोलिसांनी ड्रग्स तस्करांचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलिसांनी कल्याण पूर्वेकडील शंभर फुटी रोड येथे नाकाबंदी केली. या नाकाबंदी दरम्यान एका रिक्षामध्ये दोघजण संशयास्पदरित्या आढळून आले. पोलिसांना बघून या रिक्षा चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी पाठलाग करत ऑटो रिक्षा ताब्यात घेत सुनील यादव व युवराज गुप्ता या दोन जणांची झडती घेतली. या दोघांजवळ एमडी ड्रग्स आढळून आले.
या दोघांना पोलिसी खाका दाखवताच या दोघांनी नवी मुंबई येथील एका नायजेरियन नागरिक चुकवूइमेका इमेका हा एमडी ड्रग्स विकत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी नवी मुंबई येथे सापळा या नायजेरियन ड्रग्स तस्कराला बेड ठोकल्या. या तिघांकडून एकूण पावणे सहा लाख किमतीचे सुमारे 285 ग्रॅम ड्रग्स जप्त केले. यानंतर खडकपाडा पोलिसांचे पथक कल्याणजवळील आंबिवली इराणी वस्ती परिसरात गस्त घालत असताना एक इराणी महिला संशयस्पद फिरताना आढळून आली. पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेत झडती घेतली असता तिच्याकडे सुमारे 66 हजार रुपये किमतीचे 34 ग्राम वजनाचे एमडी ड्रग्स आढळून आले.