Kalyan News: प्रभू श्री रामाच्या नावाखाली महिलेची फसवणूक, अडीज लाखांचा सोनं लंपास
त्यासाठी देशाभारत एक वेगळाच उत्साह आहे. या उत्साहासाठी सर्वत्र तयारी सुरु आहे.
Kalyan News:जानेवारीच्या 22 तारखेला अयोध्यात राम मंदिराचा प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे. त्यासाठी देशाभारत एक वेगळाच उत्साह आहे. या उत्साहासाठी सर्वत्र तयारी सुरु आहे. दरम्यान कल्याण येथे एका महिलेचे राम नावाच्या खाली पैसे लुटल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर कल्याण येथे एकच खळबळ उडाली आहे. महिलेचा गैर फायदा घेत फसवणूक केल्याचे समोर आले आहे. (हेही वाचा- पालघर येथे 4.93 कोटी रुपयांची वीज चोरी करणाऱ्या 5 जणांच्या विरोधात कारवाई)
मिळालेल्या माहितीनुसार, एकाने पीडित महिलेला आम्ही तुम्हाला श्रीराम घडवून आणतो असं सांगून अडीज लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणात तिघांचा हात असल्याचे माहिती मिळाली आहे. या प्रकरणी पीडित महिलेने कल्याण पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. कल्याण मधील महात्मा फुले पोलिसांनी तीन जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. महिलेकडील अडीज लाखांचे ऐवज लंपास केले आहे.
पीडित महिला बुधवारी खडकपाडा येथून पायी चालली होती दरम्यान तीघांनी तिला अडवले आणि तिच्याशी मैत्रिपूर्ण बोलत तीला आम्ही राम भक्त आहोत असं सांगितले. आम्ही तुम्हाला प्रभू रामचंद्राचे दर्शन घडवून आणतो असं सांगत महिलेकडून हातातील सोन्याच्या बांगड्या आणि इतर सोन्याच्या ऐवज पिशवीत गुंडाळायला सांगितला. हे ऐवज कोणीही चोरुन नेतील असं सांगत आम्हच्या कडे द्या आम्ही संभाळतो असं सांगितले. रामाचे दर्शन घडवून आणतो अशा खोटा दावा करत महिलेकडेचे सोनं स्वत:कडे घेत महिलेकडून फरार झाले. तिला फसवणूक झाल्याचे लक्षात आले असता तिनं धीर एकटावला. या प्रकरणी महिलेने पोलिस ठाण्यात धाव घेत,सर्व घटना सांगितली. पोलिस या प्रकरणी आरोपींचा शोध घेत आहे.