COVID 19 रुग्णांच्या उपचारासाठी मनसे आमदार राजू पाटील यांचे महत्वाचे योगदान; KDMC कडे सोपवले खाजगी रुग्णालय
राजू पाटील यांनी आपले आर. आर हे खासगी रुग्णालय कोरोना वरील उपचारांसाठी कल्याण डोबिंवली महापालिकेला सोपवले आहे.
मुंबई (Mumbai) सह ठाणे (Thane) आणि कल्याण डोंबिवली (Kalyan Dombivli) विभागाला सुद्धा कोरोना व्हायरसचा (Coronavirus) मोठा फटका बसला आहे, सद्य घडीला कल्याण डोंबिवली महापालिका भागात 35 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. अशावेळी या कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी जागेची कमी भासु नये अश्या हेतूने कल्याण ग्रामीण मतदारसंघातून निवडून आलेले मनसेचे (MNS) आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी मोठे आणि महत्वाचे योगदान दिले आहे. राजू पाटील यांनी आपले आर. आर हे खासगी रुग्णालय कल्याण डोबिंवली महापालिकेला सोपवले आहे. या आर. आर. रुग्णालयात 15 ते 20 व्हेंटिलेटर तसंच 100 बेड आहेत. राजू पाटील यांच्या या दिलदार निर्णयाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. मुंबई: महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड कोरोनाबधित पोलिसाच्या संपर्कात आल्याने घेतला Home Quarantine मध्ये राहण्याचा निर्णय
कल्याण-डोंबिवलीत करोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर आमदार राजू पाटील यांनी आयुक्तांना एखादं खासगी रुग्णालय उपचारासाठी ताब्यात घ्यावं असा सल्ला दिला होता. यासोबतच त्यांनी आपलं आर. आर हे खासगी रुग्णालय सोपवण्याची देण्याची तयारीही दर्शवली होती. यासाठी आयुक्तांनी परवानगी दिली असून रुग्णालय ताब्यात घेण्यात आलं आहे. याबाबत राजू पाटील यांनी ट्विट मार्फत माहिती दिली आहे. याठिकाणी येथे IMA च्या डॉक्टरांचे सहाय्य घेऊन उपचार केले जातील, असेही राजू पाटील यांनी सांगितले आहे.
राजू पाटील ट्विट
दरम्यान, कोरोना व्हायरस सध्या राज्यात थैमान घालताना दिसून येत आहे. काल राज्यात कोरोनाच्या 221 बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 1982 वर पोहोचली आहे. अशावेळी खबरदारीचा पर्याय म्हणून राज्यात 30 एप्रिल पर्यंत लॉक डाऊन जारी करण्यात आले आहे. मुंबई आणि पुणे येथे कोरोनाच्या अधिकाधिक चाचण्या घेण्यास राज्य सरकारने सुरुवात केली आहे.