कल्याण डोंबिवली महापालिका स्थायी समिती सभापती निवडणूक 2020: शिवसेनेला धक्का, भाजपचे विकास म्हात्रे विजयी

पालिकेत शिवसेना काटावर बहुमत मिळवून सत्तेत आहे. त्यामुळे या निवडणुकीत मनसे काय भूमिका घेते यावर बरेच काही अवलंबून होते.

Kalyan Dombivli Municipal Corporation | (Photo Credit: Archived, Edited And Representative images)

Kalyan Dombivli Municipal Standing Committee Election Results 2020: कल्याण डोंबिवली महापालिका स्थायी समिती सभापतीपद निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. आजवर मित्रपक्ष म्हणून युती करुन लढलेले शिवसेना (Shiv Sena) - भाजप (BJP)  कल्याण डोंबिवली महापालिकेत स्थायी समिती निवडणूक निमित्ताने प्रथमच परस्पर विरोधात लढले. शिवसेना भाजप अशा समोरासमोर झालेल्या स्थायी समिती निवडणुकीत शिवसेनेला मोठा धक्का बसला असून, नगरसेवक विकास म्हात्रे (Vikas Mhatre)  यांच्या रुपात पालिकेच्या चाव्या भाजपच्या हातात गेल्या आहेत. स्थायी समिती सभापती निवडणुकीत विकास म्हात्रे यांचा विजय झाला आहे.

कल्याण डोंबिवली महापालिका स्थायी समिती सभापती पदासाठी गुरुवारी (3 जानेवारी 2020) मतदान झाले. पालिकेत शिवसेना काटावर बहुमत मिळवून सत्तेत आहे. त्यामुळे या निवडणुकीत मनसे काय भूमिका घेते यावर बरेच काही अवलंबून होते. (हेही वाचा, जळगाव जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडणूक 2020: भाजप उमेदवार रंजना पाटील विजयी, महाविकासआघाडी पराभूत)

स्थायी समिती सभापती पदासाठी शिवसेनेचे गणेश कोट आणि भाजपचे विकास म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. पक्षिय बलाबल पाहता स्थायी समितीत शिवसेनेचे 8 आणि काँग्रेस 1 असे 9 सदस्य आहेत, तर भाजपचे 7 सदस्य असून मनसेचा 1 सदस्य आहे. त्यामुळे सख्याबळाच्या तुलनेत विचार करता शिवसेना अवघ्या एका मताने बहुमतात होती. त्यामुळे ही निवडणुक चुरशीची होणार याबाबत काहीच शंका नव्हती.