K Nalinakshan Dies: बीएमसीचे माजी आयुक्त के नलिनाक्षन यांचे निधन; पूजा करताना कपड्यांनी घेतला पेट

ते 79 वर्षांचे होते.

Fire | (Photo Credits: Pixabay)

मुंबई महानगर पालिकेचे माजी आयुक्त के नलिनाक्षन (K Nalinakshan) यांचं निधन झाले आहे. ते 79 वर्षांचे होते. शुक्रवार (9 जुलै) दिवशी मसिना हॉस्पिटल मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान मुंबईच्या राहत्या घरी पूजा करताना कपड्यांनी पेट घेतल्याने गंभीर दुखापत झाल्याने उपचारादरम्यान K Nalinakshan यांचा मृत्यू झाला. K Nalinakshan हे 1967 च्या बॅचचे आयएएस ऑफिसर होते.

K Nalinakshan यांनी मुंबईत महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून 1999 ते 2001 पर्यंत काम केले होते त्यानंतर मंत्रालयात त्यांनी चीफ सेक्रेटरी ऑफ ट्रान्सपोर्ट अ‍ॅन्ड एक्साईज मध्ये काम केले होते. सध्या ते मुंबईत चर्चगेट परिसरामध्ये Charleville Apartments मध्ये राहत होते.

K Nalinakshan यांच्या मुलाने इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी कधीच पूजा चुकवली नाही. सकाळी पूजा करणं हा त्यांचा नित्यनियम होता. बुधवारी देखील ते पूजा करत होते. देवघराची खोली आतून बंद होती. त्यांच्या लूंगीने कापराच्या दिव्यामुळे पेट घेतला. आई आणि हाऊस हेल्प घरात होती पण या अपघाताची त्यांना माहिती मिळेपर्यंत उशीर झाला होता. त्यानंतर भायखळाच्या मसिना रूग्णालयात त्यांना बर्न सेक्शन मध्ये दाखल करण्यात आले. सुरूवातीला ते ठीक होते पण हळूहळू प्रकृती खालावत गेली. 2 दिवसांतच त्यांची प्राणज्योत मालवली. ते 80-90% भाजले होते.

Nalinakshan यांच्या पश्चात पत्नी आणि 3 मुलं, सूना आणि नातवंडं असा परिवार आहे. त्यांचा एक मुलगा होंगकॉंग मध्ये राहतो.