K. Chandrashekar Rao in Maharashtra: के चंद्रशेखर राव यांची महाराष्ट्रात मोर्चेबांधणी; नांदेड येथील मोंढा मैदानावर 5 फेब्रुवारी रोजी जाहीर सभेचे आयोजन
चंद्रशेखर राव येत्या 5 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रात येत असून, नांदेड (Nanded) येथील नवीन मोंढा मैदानात त्यांची सभा पार पडणार आहे. ही सभा 15 जानेवारीलाच पार पडणार होती. मात्र, शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची अचारसंहिता आड आली आणि ती सभा पुढे ढकलण्यात आली. सीआर (KCR) यांना महाराष्ट्र कशी साथ देतो याबाबत येणारा काळच ठरवणार आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekar Rao) यांची राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यासाठी नुकताच आपल्या तेलंगणा राष्ट्र समिती (Telangana Rashtra Samithi) या प्रादेशिक पक्षाचे नावही भारत राष्ट्र समिती (Bharat Rashtra Samithi) असे बदलले. तसेच त्यांनी हा पक्ष राष्ट्रीय पक्षात रुपांतरीत केला. आता ते महाराष्ट्रातही नशिब आजमावून पाहणार आहेत. के. चंद्रशेखर राव येत्या 5 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रात येत असून, नांदेड (Nanded) येथील नवीन मोंढा मैदानात त्यांची सभा पार पडणार आहे. ही सभा 15 जानेवारीलाच पार पडणार होती. मात्र, शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची अचारसंहिता आड आली आणि ती सभा पुढे ढकलण्यात आली. केसीआर (KCR) यांना महाराष्ट्र कशी साथ देतो याबाबत येणारा काळच ठरवणार आहे.
के. चंद्रशेखर राव आपल्या राजकीय आयुष्यात पहिल्यांदाच महाराष्ट्रात राजकीय सभा घेत आहेत. त्यामुळे या सभेला कसा प्रतिसाद मिळतो याबाबत उत्सुकता आहे. आगामी कालात कर्नाटक (Karnatak) , महाराष्ट्र (Maharashtra) , छत्तीसगड (Chhattisgarh) , गुजरात (Gujrat) आणि ओडिशामध्ये (Odisha) आदी राज्यांमध्ये आपल्या 'तेलंगणा राष्ट्र समिती' राजकीय पक्षाचा विस्तार करण्याचा विचार करत आहेत. चंद्रशेखर यांचा विविध राज्यांमध्ये असलेल्या तेलुगू भाषक मतदारांवर डोळा आहे. (हेही वाचा, CM Uddhav Thackeray: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तेलंगणाचे सीएम के चंद्रशेखर राव यांच्यात होणार भेट, कारण गुलदस्त्यात, राजकीय वर्तुळात चर्चा)
राजकीय विश्लेषक सांगतात की, चंद्रशेखर राव यांचा 'तेलंगण राष्ट्र समिती' हा पक्ष तेलंगणा वगळता देशभरातील लोकसभेच्या साधारण 30 जागांवर परिणाम करु शकतो. राज्यनिहाय ही संख्या खालीलप्रमाणे:
कर्नाटक
विधानसभा- 40
लोकसभा-14
महाराष्ट्र
विधानसभा- 22
लोकसभा- 08
छत्तीसगड
विधानसभा- 12
लोकसभा- 03
महाराष्ट्रापुरते बोलाचे तर नांदेड जिल्ह्यातील खास करुन सीमाभागावर असलेल्या किनवट, माहूर, बिलोली, देगलुर, धर्माबाद आदी गावांना डोळ्यासमोर ठेवले जाण्याची शक्यता आहे. उल्लेखनीय असे की, असदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएम पक्षानेही नांदेडमधुनच महाराष्ट्रात चंचूप्रवेश केला होता. महत्त्वाचे म्हणजेच महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या अनेक गावांनी कर्नाटक आणि तेलंगणा राज्यात जाण्यासाठी ठरावही मंजूर केले होते. या पार्श्वभूमीवर के. चंद्रशेखर राव यांच्या महाराष्ट्र दौऱ्याची जोरदार चर्चा आहे.