Jyotiba Yatra, Kolhapur 2021: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर येथील जोतिबा यात्रा रद्द

कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक धार्मिक, सास्कृतिक आणि समाजिक कार्यक्रम पुढे किंवा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Jyotiba chaitra Yatra (Photo Credits: Instagram)

महाराष्ट्रात (Maharashtra) पुन्हा कोरोनाने (Coronavirus) डोके वर काढले आहे. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक धार्मिक, सास्कृतिक आणि समाजिक कार्यक्रम पुढे किंवा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचपार्श्वभूमीवर कोल्हापूर (Kolhapur) येथील जोतिबा डोंगरावरची यात्रादेखील (Jyotiba Yatra) रद्द करण्यात आली आहे. कोरोना महामारीमुळे जोतिबा यात्रेतील मानकऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यातील 5 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ही यात्रा रद्द कर्ण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एवढेच नव्हेतर, जोतिबा मंदिराकडे जाणारे सर्वच रस्त बंद करण्यात आले आहेत. तसेच माध्यम प्रतिनिधींनासुद्धा प्रवेश निषिद्ध करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी भर पडत आहे. कोरोनाबाधितांची वाढती रुग्णसंख्या पाहता राज्यातील अनेक सण, संमारंभ, यात्रा, जत्रा रद्द करण्यात आल्या आहेत. राज्यात विविध शहरातील धार्मिक कार्यक्रम मोजक्या लोकांच्या उपस्थित पार पडत आहेत. याचपाश्वभूमीवर कोल्हापूर येथील जोतिबा डोंगरावरील यात्रा केवळ काही मानकऱ्यांच्या उपस्थित पार पडणार होती. परंतु, यातील 5 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने ही यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आबे. मानकऱ्यांसह गावातील अनेकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे बोलले जात आहे. या संदर्भात न्युज 18 लोकमतने वृ्त्त दिले आहे. हे देखील वाचा- Corona Vaccination: शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मोफत कोरोना लसीकरणाबाबतचे ट्विट केले डिलीट

महाराष्ट्रात आज (25 एप्रिल) 66 हजार 191 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 61 हजार 450 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 35 लाख 30 हजार 60 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 6 लाख 98 हजार 354 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.