Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रात काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष; निकालाचा कल समजताच विजयी मिरवणुकीची तयारी सुरू

याशिवाय संभाजीनगर येथून चुरशीच्या लढतीत इम्तियाज जलील आघावर आहेत. तर धाराशिव मधून ठाकरे गट शिवसेना उमेदवार ओम राजे निंबाळकर आघाडीवर आहेत. तसेच नंदूरबार येथून काँग्रेस पक्षाचे उमेदवार आघाडीवर आहेत.

Praniti Shinde, Imtiaz Jalil, Pratibha Dhanorkar (PC- Facebook)

Lok Sabha Election Result 2024: लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election) साठी आज मतमोजणी सुरू झाली आहे. लोकसभेच्या 48 जागांवरील विजयी उमेदवारांची नावे आज समोर येणार आहेत. अशातचं आता महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा (Lok Sabha Election Results in Maharashtra) कल समजताचं काँग्रेस (Congress) पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सांगलीमध्ये काँग्रेसचे बंडखोर व अपक्ष उमेदवार विशाल पाटील आघाडीवर आहेत. याशिवाय संभाजीनगर येथून चुरशीच्या लढतीत इम्तियाज जलील आघावर आहेत. तर धाराशिव मधून ठाकरे गट शिवसेना उमेदवार ओम राजे निंबाळकर आघाडीवर आहेत. तसेच नंदूरबार येथून काँग्रेस पक्षाचे उमेदवार आघाडीवर आहेत.

दरम्यान, सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी आघाडी घेतली आहे. प्रणिती शिंदे या उत्तर, दक्षिण सोलापूर, मंगळवेढा पंढरपूर, मोहोळ या मतदारसंघातून आघाडीवर आहेत. या भागातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आहे. (हेही वाचा -Lok Sabha Election Results 2024 Live Updates: Amit Shah गांधीनगर मधून 1 लाख मतांनी आघाडीवर)

 रामटेक मतदारासंघातून बरवे 8 हजार मतांनी पुढे आहेत. याशिवाय, बीड मतदारसंघातून चौथ्या फेरीत 8956 मतांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) उमेदवार बजरंज सोनवणे आघाडीवर आहेत. तसेच बारामती लोकसभेच्या जागेवर नंणद आणि भावजई यांच्यात चुरशीची लढत आहे. येथे शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात थेट लढत आहे. 2009 पासून सुप्रिया सुळे या मतदारसंघातून विजयी होत आहेत. सुनेत्रा पवार येथून पराभूत झाल्या तर अजित पवारांसाठी हा मोठा धक्का असणार आहे. (हेही वाचा - Maharashtra Lok Sabha Election Results 2024: अजित पवार यांना धक्का, बारामती येथून सुप्रिया सुळे 19 हजारांनी आघाडीवर)

 

तथापी, धुळे लोकसभा मतदारसंघांमध्ये पहिल्या फेरीमध्ये काँग्रेस उमेदवार शोभा बच्छाव यांनी 32 मतांनी आघाडी घेतली. तसेच नंदुरबार येथे काँग्रेस उमेदवार गोवल पाडवी यांना पाहिल्या फेरीत 19 हजार मतांची आघाडी घेतली. यानंतर कार्यकर्यांमध्ये जल्लोष साजरा केला. याशिवाय चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर या 16 हजार मतांनी आघाडीवर आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif