गांधी जयंती दिवशी महेश मांजरेकर यांच्याकडून 'गोडसे' सिनेमाची घोषणा; जितेंद्र आव्हाड यांची संतप्त प्रतिक्रीया (View Tweet)
हा सिनेमा महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे यांच्यावर आधारीत आहे.
अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनी आपल्या नव्या सिनेमाची घोषणा केली आहे. हा सिनेमा महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे यांच्यावर आधारीत आहे. विशेष म्हणजे गांधी जयंती दिवशी 'गोडसे' (Godse) या सिनेमाचा टीझर शेअर करत सिनेमाची घोषणा करण्यात आली. यावरुन आता वाद उफाळण्याची शक्यता आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्विटच्या माध्यमातून संतप्त प्रतिक्रीया दिली आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, "महेश मांजरेकर कोण आहेत? भारतीय सिनेमात त्यांचे काय योगदान आहे? लक्ष वेधून घेण्यासाठी अशा नाटकांची गरज आहे." ट्विटमध्ये त्यांनी टीझरचा एक स्क्रीनशॉर्ट शेअर केला आहे.
Jitendra Awhad Tweet:
सिनेमाचा टीझर शेअर करताना महेश मांजरेकर यांनी लिहिले की, "वाढदिवसाच्या घातक शुभेच्छा! यापूर्वी कोणीही सांगण्याचे धाडस केले नाही अशा कथेच्या साक्षीसाठी सज्ज व्हा! महात्मा गांधी यांच्या 152 व्या जयंती निमित्त संदीप सिंग, राज शांडिल्य आणि महेश मांजरेकर यांनी गोडसे सिनेमाची घोषणा केली आहे."
पहा सिनेमाचा टीझर:
पुढे त्यांनी लिहिले की, “नथुराम गोडसेची कथा नेहमीच माझ्या हृदयाच्या जवळ आहे. या स्वरूपाच्या चित्रपटाला पाठिंबा देण्यासाठी खूप धैर्य लागते. माझा नेहमीच कठीण विषयांवर आणि बिनधास्त कथाकथनावर विश्वास असतो आणि हा विषय त्यात योग्य बसला. गांधींवर गोळीबार करणारा माणूस वगळता लोकांना गोडसेबद्दल अधिक माहिती नाही. त्याची कहाणी सांगताना, आम्हाला ना कुणाचे संरक्षण करायचे आहे ना कोणाच्या विरोधात बोलायचे आहे. कोण बरोबर आहे की अयोग्य हे आम्ही प्रेक्षकांवर सोडू." (महाराष्ट्रात Theaters Unlock ची घोषणा होताच 'दे धक्का २' ते झिम्मा, 'या' मराठी सिनेमांनी जाहीर केल्या प्रदर्शनाच्या तारखा)
गांधी-गोडसे या वादाचा आणि अत्यंत संवेदनशील विषय आहे. त्यावर सिनेमाच्या माध्यमातून भाष्य करणे, वादग्रस्त ठरु शकते. दरम्यान, या 2022 पासून या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होईल.